लंडनमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका 16 वर्षीय किशोराचाही समावेश आहे. याचबरोबर, या मोहिमेदरम्यान एका तरुण महिलेसही पोलिसांनी गोळी घातली. या महिलेची प्रकृती स्थिर असून तिचे नाव प्रसिद्ध करण्यात आलेले नाही

लंडन - ब्रिटनची राजधानी असलेल्या लंडनमधील पोलिस दलाने आज (शुक्रवार) राजधानीबरोबरच देशाच्या विविध भागांत छापे मारत दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न उधळवून लावल्याची घोषणा केली. या छाप्यांमध्ये सहा जणांना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका 16 वर्षीय किशोराचाही समावेश आहे. याचबरोबर, या मोहिमेदरम्यान एका तरुण महिलेसही पोलिसांनी गोळी घातली. या महिलेची प्रकृती स्थिर असून तिचे नाव प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. पोलिस दलाने दहशतवादी कटाची माहिती उघड केलेली नाही. ब्रिटीश संसदेनजीक काल (गुरुवार) एका इसमास अटक करण्यात आली होती. आरोपीजवळ मोठे सुरे सापडले होते. या पार्श्‍वभूमीवर देशभरातील बंदोबस्त वाढविला असतानाच पोलिसांनी आज देशभरात छापे मारत दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आणला.

अटक करण्यात आलेल्यांची सध्या चौकशी करण्यात येत असून अद्यापी त्यांच्याविरोधातील आरोपनिश्‍चिती करण्यात आलेली नाही.

Web Title: U.K. police arrest 6 in counterterror raids