लंडनमधील मेट्रो स्फोटाची इसिसने स्वीकारली जबाबदारी

वृत्तसंस्था
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

मागील सहा महिन्यांतील ब्रिटनवरील हा पाचवा दहशतवादी हल्ला असल्याने स्थानिक सुरक्षा यंत्रणा हादरल्या आहेत. "स्कॉटलंड यार्ड'ने हा बॉंबस्फोट दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले होते. अखेर इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. ब्रिटनमध्ये दहशतवादी हल्ल्यांची शक्यता वाढल्याचे पंतप्रधान थेरेसा मे यांनी म्हटले आहे. 

लंडन : ब्रिटनला पुन्हा एकदा लक्ष्य करत लंडन शहरातील 'पार्सन्स ग्रीन स्थानका'वरील भूमिगत मेट्रोमध्ये 'आईडी'चा समावेश असलेल्या बकेट बॉंबस्फोटाची जबाबादारी इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. या स्फोटामध्ये 22 प्रवासी भाजले गेले होते.

या स्फोटानंतर "पार्सन्स ग्रीन स्थानका'वर एकच खळबळ निर्माण झाली होती. आगीमध्ये गंभीररीत्या भाजलेले प्रवासी स्थानकावर सैरावैरा धावताना दिसत होते. स्फोटानंतर भडकलेल्या आगीमुळे अनेकांचे चेहरे, पायांना गंभीर दुखापत झाली, तर काहीजणांच्या डोक्‍यावरील केसही जळाले होते. या स्फोटानंतर रेल्वेस्थानकावर चेंगराचेंगरीही झाली, यामध्येही अनेकजण जखमी झाले आहेत. 

मागील सहा महिन्यांतील ब्रिटनवरील हा पाचवा दहशतवादी हल्ला असल्याने स्थानिक सुरक्षा यंत्रणा हादरल्या आहेत. "स्कॉटलंड यार्ड'ने हा बॉंबस्फोट दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले होते. अखेर इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. ब्रिटनमध्ये दहशतवादी हल्ल्यांची शक्यता वाढल्याचे पंतप्रधान थेरेसा मे यांनी म्हटले आहे. 

स्फोटासाठी बकेटचा वापर 
ज्या प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये ही स्फोटके ठेवण्यात आली होती, ती बकेट एका सुपर मार्केटमधील प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये गुंडाळून ठेवण्यात आली होती. जळालेल्या अवस्थेतील या बकेटमधून काही वायरही बाहेर आल्याचे सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या छायाचित्रामध्ये दिसत आहे. सध्या ब्रिटिश पोलिस रेल्वे स्थानकावर सुरा घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाचा शोध घेत आहेत. या सुराधारी तरुणाने ही बकेट मेट्रोमध्ये ठेवून पळ काढल्याचे बोलले जाते. हल्लेखोराने "आयईडी' स्फोटकांना टायमर देखील जोडला होता.

Web Title: UK terror threat level raised to critical after ISIS 'cell' claims responsibility for Tube train bombing