युक्रेन युद्धाला शंभर दिवस पूर्ण : युद्धभूमीवर वर्चस्व विनाशाचेच

अनेक समस्यांनी जगाला घेरले; मानवतेला नख लावणाऱ्या या युद्धाचा आढावा घेणे संयुक्तिक आहे.
Ukraine russia war 100 days of Dominance battlefield is destruction finance crisis inflation oil price
Ukraine russia war 100 days of Dominance battlefield is destruction finance crisis inflation oil price sakal

जीनिव्हा : रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याच्या घटनेला आज (ता. ३) शंभर दिवस पूर्ण झाले. या शंभर दिवसांत युक्रेनच्या रस्त्यांवर पडलेले मृतदेह, लष्करी वाहने, बाँबहल्ल्यात मोडून पडलेली शहरे, नाटोशी जवळीक साधली म्हणून युक्रेनला धडा शिकविण्याचा रशियाचा निर्धार, युक्रेनकडून मदतीची कळकळीची वारंवार होणारी विनवणी आणि निष्पाप जनतेचा आक्रोश या व्यतिरिक्त वेगळे चित्र जगाला दिसलेले नाही.

रशिया-युक्रेन युद्धात कोणाची बाजू बरोबर, यावर सखोल चर्चा होत आहे आणि पुढेही होईल; पण या विनाशकारी युद्धामुळे सामान्य जनतेचे मात्र प्रचंड हाल झाले आहेत. या युद्धामुळे जगभरात महागाईचा, अन्नाच्या कमतरतेचा, इंधनाच्या कमतरतेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याशिवाय मृत्यू, विनाश, स्थलांतर आणि आर्थिक हानी यांचेच युद्धभूमीवर वर्चस्व राहिल्याचे जगाने पाहिले. त्यामुळे पर्यावरणाची हानी आणि इतर मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. मानवतेला नख लावणाऱ्या या युद्धाचा आढावा घेणे संयुक्तिक आहे.

मानवी हानी

या युद्धात निश्‍चित किती जणांचा मृत्यू झाला, हे सांगणे अवघड आहे. तरीही सरकारी अधिकारी, संयुक्त राष्ट्रे आणि स्वयंसेवी संस्था या हानीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या युद्धात आतापर्यंत साठ हजारांहून अधिक जणांना जीव गमवावा लागल्याचा अंदाज आहे. एकट्या मारिउपोल शहरात रशियाच्या हल्ल्यांत २१ हजारहून अधिक नागरिकांचे प्राण गेले आहेत. शिवाय, सध्या संघर्ष सुरु असलेल्या सिव्हिरोदोनेत्स्क शहरातही १५०० जणांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या दाव्यानुसार, युक्रेनचे रोज ६० ते १०० सैनिक धारातिर्थी पडत आहेत. रशियाचेही ३० हजार सैनिक युद्धात मारले गेल्याचा झेलेन्स्कींचा दावा आहे. किती जखमी झाले, याची निश्‍चित नोंदच नाही.

पायाभूत सुविधा उद्‌ध्वस्त

  • ३८००० - निवासी इमारती

  • १९०० - शैक्षणिक इमारती

  • ५० - रेल्वे पूल

  • ५०० - कारखाने

  • ५०० - रुग्णालये

  • २० टक्के - रशियाच्या ताब्यात गेलेला भाग

रशियावरील आर्थिक परिणाम

  • रशियातून तेल आणि नैसर्गिक वायूसह अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवांच्या आयातीवर निर्बंध

  • एकूण पाच हजार निर्बंध

  • ३०० अब्ज डॉलर किमतीचे सोने आणि परकी चलन गोठविले

  • हवाई वाहतूक ३० टक्क्यांनी घटली

  • अनेक कंपन्यांचा काढता पाय

युक्रेनवरील आर्थिक परिणाम

  • ६०० अब्ज डॉलरचे नुकसान

  • दोन कोटी २० लाख टन धान्य निर्यातीविना पडून

जगावरील परिणाम

  • महागाईत वाढ

  • कच्च्या तेलाच्या किमतीत २५ टक्क्यांनी वाढ, परिणामी इंधन दरवाढ

  • आफ्रिका खंडात अन्नटंचाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com