बाॅम्बस्फोटांनी युक्रेन हादरले, रशियन सैनिकांकडून पुल-इमारती जमीनदोस्त

बाॅम्बस्फोटांनी युक्रेन हादरले
Ukraine War
Ukraine Waresakal

किव्ह : युक्रेनची राजधानी किव्ह रविवारी (ता.पाच) अनेक बाॅम्बस्फोटांनी हादरली. शहराचे महापौर विटाली किट्स्को यांनी स्वतः घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी टेलिग्राफ मॅसेजिंग अॅपवर लिहिले, की राजधानीच्या डार्नित्सकी आणि निप्रोवस्की जिल्ह्यात अनेक बाॅम्बस्फोट झाले. मदत आणि बचावशी संबंधित लोक घटनास्थळावर काम करत आहे. बाॅम्बस्फोटांविषयी तपशील माहितीची प्रतिक्षा आहे. यापूर्वी शनिवारी रशियन सैनिकांनी पूर्व युक्रेनच्या (Ukraine) एका प्रदेशावर हल्ला केला आहे. (Ukrainian Capital Kyiv Rocked Several Explosions)

Ukraine War
काश्मीरमध्ये जे घडतयं त्याने भारतीयांच्या मनात राग अन् चिंता : केजरीवाल

हल्ल्यांच्या वेळी पुल आणि इमारती जमीनदोस्त झाल्याची माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली. प्रांताचे गव्हर्नर सेरही हैदाई यांनी सांगितले, रशियन (Russia) आणि युक्रेनियन सैन्यादरम्यान सिविएरोदोनेस्क आणि लिसिचन्स्कमध्ये भीषण युद्ध झाले. रशियाच्या हल्ल्यांमध्ये जवळच्या हिरस्के गावात आई आणि मुलासह चार लोकांचा मृत्यू झाला.

Ukraine War
पोलिसांची क्रूरता! तरुणाला इलेक्ट्रिक शाॅक्स दिले, प्रकृती चिंताजनक

आताही युक्रेनच्या ताब्यात लुहान्स्क प्रांत

लुहान्स्क प्रांत आताही युक्रेनच्या ताब्यात आहे. काही दिवसांपूर्वी रशियाने सिविएरोदोनेस्कवर ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या. येथील एकूण लोकसंख्या जवळपास १ लाख आहे. रशियाने डोनेस्कतच्या बखमुट या शहराजवळील भागात हल्ले तीव्र केले आहे. १०० दिवसानंतरही युद्ध सुरुच असल्याचे युक्रेनच्या सैन्याने सांगितले.

Ukraine War
...नऊवारी साडी नेसून इव्हेंट करण्याची गरज नाही, नीलम गोऱ्हेंची भाजपवर टीका

नागरिकांचे मृतदेह स्मशान भूमीतून काढले

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले, की किव्हच्या जवळील भागातून रशियन सैन्याने मागे फिरल्यानंतर युक्रेनच्या राजधानीच्या क्षेत्रात आतापर्यंत १ हजार ३०० पेक्षा अधिक नागरिकांचे मृतदेह स्मशानभूमीतून काढण्यात आले आहे. मंत्रालयाच्या प्रवक्ता एलोना मतवेयेवा म्हणाले, मृतदेहांना न्यायिक तपासणीसाठी शवगृहात पाठवले गेले आहे. मृतांपैकी २०० ची ओळख पटली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com