Ukraine War : युक्रेनी सैनिकाची ऑन कॅमेरा हत्या; संतापलेल्या राष्ट्राध्यक्षांनी घेतली बदल्याची शपथ | Ukrainian soldier executed on camera Zelenskyy vows to find the murderers | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ukraine Soldier
Ukraine War : युक्रेनी सैनिकाची ऑन कॅमेरा हत्या; संतापलेल्या राष्ट्राध्यक्षांनी घेतली बदल्याची शपथ

Ukraine War : युक्रेनी सैनिकाची ऑन कॅमेरा हत्या; संतापलेल्या राष्ट्राध्यक्षांनी घेतली बदल्याची शपथ

रशियन सैन्याने एका युक्रेनियन सैनिकाची हत्या केल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होऊ लागला आहे. हा व्हिडीओ पाहून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की संतापले आहेत. या व्हिडीओमधल्या सैनिकाच्या मारेकऱ्यांना शोधून काढण्याची शपथ झेलेन्स्की यांनी घेलती आहे.

व्हिडिओमध्ये, कथितपणे रशियन कैदेत असलेला एक युक्रेनियन सैनिक खंदकात सिगारेट ओढताना दिसत आहे. "स्लावा युक्रेनी (युक्रेनचे वैभव)" असे म्हटल्यावर शिपायाने कॅमेरासमोरच्या सैनिकांवर गोळ्यांचा मारा केला. व्हिडिओमध्ये, शूट करणारा रशियन सैनिक असल्याचं सांगितलं जात आहे. युक्रेनियन आर्मीच्या 30 व्या मेकॅनाइज्ड ब्रिगेडने मंगळवारी या सैनिकाचं नाव टायमोफी मायकोलायोविच शादुरा असं असल्याचं सांगण्यात येत आहे.

ब्रिगेडच्या म्हणण्यानुसार, हा सैनिक शादुरा तुकडीचा भाग होता आणि बखमुतजवळ लढल्यानंतर 3 फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. या सैनिकाचा मृतदेह त्यांच्याच ताब्यात आहे. त्याचा मृतदेह हाती आल्यावर या सैनिकाची ओळख पटेल, असंही या ब्रिगेडने सांगितलं आहे.

हा व्हिडीओ पाहून झेलेन्स्की म्हणाले की, आक्रमण कर्त्यांनी एका सैनिकाला कसं क्रूरपणे मारलं पाहा. या सैनिकाने धैर्याने युक्रेनचा गौरव केला होता. त्यांनी लोकांना एकत्र येण्याचे आवाहन करून सांगितले की, "आपण सर्वांनी एकजुटीने प्रतिसाद द्यावा अशी माझी इच्छा आहे. आम्ही मारेकऱ्यांना शोधू, अशी शपथ घेतो, असेही ते म्हणाले.

युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी हा व्हिडिओ हे युद्ध नरसंहाराचा आणि घृणास्पद युद्ध गुन्ह्याचा आणखी एक पुरावा आहे, असं म्हणत आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाकडून तात्काळ तपास करण्याची मागणी केली.