
युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार असलेल्या लियूबोव्ह त्सबुलस्का यांनी याबद्दल ट्विट केलं आहे.
युक्रेनमध्ये महिलेनं बरणी फेकून पाडलं ड्रोन
किव्ह - युक्रेनची राजधानी किव्हमध्ये रशियन सैन्याकडून हल्ले सुरु आहेत. रशियाच्या सैन्याने किव्हला चारही बाजूंनी घेरलं आहे. तर युक्रेनची जनता रशियाच्या या हल्ल्यांना उत्तर देत आहे. आता युक्रेनमधील महिलेने बरणी फेकून मारत तिच्या घराबाहेर आलेला रशियन ड्रोन पाडला आहे. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार असलेल्या लियूबोव्ह त्सबुलस्का यांनी याबद्दल ट्विट केलं आहे.
लियूबोव त्सबुलस्का यांनी म्हटलं की, किव्हमध्ये एका महिलेनं रशियन ड्रोनला बाल्कनीत उभा राहून बरणी फेकून मारत पाडलं. तुम्ही कसं काय या देशावर ताबा मिळवण्याचं स्वप्न पाहू शकता? असा प्रश्नही विचारला आहे. दरम्यान, याबाबत इतर कोणीही स्पष्ट माहिती दिलेली नाही.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, लुटारूंकडून एका घराचा शोध सुरु होता. त्यासाठी ड्रोन घराभोवती फिरत असताना महिलेनं त्यावर बरणी फेकून मारली आणि तो खाली पाडला.
हेही वाचा: युक्रेनच्या महिला सेक्सी अन्...; ब्राझिलच्या नेत्याचं लाजीरवाणं विधान
रशियाने युक्रेनमधील विमानतळांसह शस्त्रसाठ्यांच्या गोदामांवर हल्ले केले आहेत. यात मोठ्या प्रमाणावर यश आल्याची माहिती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शनिवारी दिली होती. पुतीन यांनी म्हटलं की, रशियन लष्कराने त्यांना दिलेलं काम पूर्ण करेल आणि युक्रेनमध्ये नियोजित मोहिमेनुसार लष्कर पुढे जात आहे.
Web Title: Ukrainian Woman Downed Drone Using
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..