पाकिस्तानचा मक्की ठरला जागतिक दहशतवादी; UN दिली मंजूरी: Abdul Rehman Makki | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abdul Rehman Makki

Abdul Rehman Makki: पाकिस्तानचा मक्की ठरला जागतिक दहशतवादी; UN दिली मंजूरी

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) सोमवारी पाकिस्तानमधील दहशतवादी आणि लष्कर-ए-तैयबाचा (LeT) प्रमुख हाफिज सईदचा मेहुणा अब्दुल रहमान मक्की याला ISIL अंतर्गत अखेर जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. (UN blacklists LeT deputy chief Abdul Rehman Makki as global terrorist)

भारतात तसेच आंतर राष्ट्रीय स्तरावर अनेक दहशतवादी कारवाया करणारा पाकिस्तान मधील कुख्यात दहशतवादी आणि लष्कर-ए-तैयबाचा (LeT) प्रमुख हाफिज सईदचा मेहुणा अब्दुल रहमान मक्की याला अखेर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) सोमवारी आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले.

हेही वाचा: Nepal Plane Crash : संक्रांतीच्या शुभेच्छा ठरल्या अखेरच्या; लोककलावंताची पोस्ट व्हायरल

तब्बल तीन वर्षांपासून भारत या प्रयत्नात होता. मात्र, चीन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत याला विरोध करत असल्याने हा प्रस्ताव फेटाळला जात होता. तब्बल ३ वर्ष ८ महिन्यांनी चीन नरमला असून अब्दुल रहमान मक्की याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास चीनने मंजूरी दिल्याने पाकिस्तानला धक्का बसला आहे.

काल १६ जानेवारी रोजी पुन्हा भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषद समितीत अल-कायदा आणि संबंधित दहशतवाद्यांच्या यादीत मक्कीला प्रतिबंधित करण्याचा प्रस्ताव मांडला होता.

हेही वाचा: G20 Pune : ज्यासाठी संपूर्ण पुणे शहर सजलंय ते G20 नेमकं आहे तरी काय?

अखेर चीनने याला मंजूरी दिल्याने सुरक्षा परिषदेने मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे आता मक्कीच्या संपत्तीवर आणि प्रवासावर टाच येणार आहे. चीनने मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशवादी ठरवण्यास मंजूरी दिल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

टॅग्स :Pakistan