म्यानमारमधील लष्करी बंड अपयशी करू; अँटोनिओ गुटेरेस यांचा इशारा

Myanmar
Myanmar

न्यूयॉर्क - म्यानमारमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अद्यापही सुरक्षा परिषदेत एकमत झाले नसल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच, या देशातील लष्करी बंड अयशस्वी करण्यासाठी आणि तेथील लष्करी नेतृत्वावर दबाव आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्र आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

म्यानमारमध्ये लष्करी बंड होऊन या देशाच्या नेत्या आँग सान स्यू की, अध्यक्ष यू विन मिंट आणि इतर अनेक नेत्यांना लष्कराने ताब्यात घेतले आणि सत्ता हातात घेतली आहे. बेकायदा पद्धतीने वॉकी टॉकी आयात केल्याचा आरोप स्यू की यांच्यावर ठेवण्यात आला आहे. म्यानमारमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी (ता. २) संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक झाली होती. मात्र, यासंदर्भात कारवाईबाबत त्यांच्यात एकमत झाले नाही. एका मुलाखतीदरम्यान याबाबत बोलताना गुटेरेस म्हणाले,‘‘ सुरक्षा परिषदेत एकमत न झाल्याने आपण म्यानमारवर दबाव आणून तेथील लष्करी बंड अयशस्वी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्र आणणार आहे.’’

‘जी-७’ देशांनाही चिंता
वॉशिंग्टन : म्यानमारमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारकडून सत्ता लष्कराने हस्तगत केल्याच्या घटनेवर ‘जी-७’ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आज चिंता व्यक्त केली आहे. लष्करी सत्तेने तातडीने आणीबाणी उठवावी आणि लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारकडे सत्ता सोपवावी, अशी संयुक्त मागणी यावेळी करण्यात आली. ‘जी-७’ देशांच्या गटात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com