नव्या सरकारसाठी झाले मतदान; पण बॅलेट पेपरवरच!

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

650 सदस्य असलेल्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये हुजूर पक्षाला 326 हा जादुई आकडा सहज पार करता येईल, असे वाटत आहे.

लंडन : युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या सार्वमतानंतर राजकीयदृष्ट्या अस्थिर झालेल्या ब्रिटनमध्ये गुरुवारी (ता.12) सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झाले. गेल्या पाच वर्षांमध्ये येथे तिसऱ्यांदा सार्वत्रिक निवडणूक होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

ब्रिटनच्या कनिष्ठ सभागृहातील 650 जागांसाठी देशभरात 3,322 उमेदवार रिंगणात आहेत. आज रात्री मतदान संपल्यानंतर लगेचच मतमोजणी सुरू होणार आहे. त्यामुळे उद्या (ता. 13) ब्रिटनच्या नागरिकांचा कौल जाहीर होणार आहे. कोणत्याही पक्षाला 326 पेक्षा अधिक जागा मिळाल्यास त्यांना सरकार स्थापन करता येणार आहे. 

Image may contain: 2 people, people smiling, people standing and outdoor

हुजूर पक्षाचे नेते आणि पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी 31 जानेवारी 2020 पर्यंत 'ब्रेक्‍झिट'ची अंमलबजावणी करण्यावर आपल्या प्रचारात भर दिला होता. तर विरोधी मजूर पक्षाने स्थानिक मुद्यांवर विशेष जोर दिला होता.

- सोळावं वरीस 'ग्रेटा'चं; ठरली 'पर्सन ऑफ द इअर'!

सध्यातरी बोरीस यांचे पारडे जड वाटत आहे. काट्याची टक्कर होणार हे निश्चित आहे. गेल्या वेळेस 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर आताची निवडणूक वेगळी भासत आहे. हुजूर पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, याची शक्यता थोडी घटली आहे. 'यूगव पोल'मध्ये हुजूर पक्षाला 339 जागा, मजूर पक्षाला 231, लिबरल डेमोक्रेट्सला 15 आणि स्कॉटिश नॅशनल पार्टी (एसएनपी) ला 21 जागांवर विजय मिळू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

650 सदस्य असलेल्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये हुजूर पक्षाला 326 हा जादुई आकडा सहज पार करता येईल, असे वाटत आहे. मात्र, त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे राजकीय विश्लेषक अँथनी वेल्स यांनी म्हटले आहे.  

- जगातील सर्वात तरुण पंतप्रधान पाहिल्या का?

भारतीय मतदारांसाठीची आश्वासने

भारतीय मतदारांना डोळ्यासमोर ठेऊन हुजूर आणि मजूर पक्षाच्या नेत्यांनी विविध आश्वासने दिली आहेत. यामध्ये मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांनी म्हटले आहे की, जर ते विजयी झाले तर जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल ब्रिटन सरकार भारत देशाची जाहीर माफी मागेल. तर हुजूर पक्षाचे बोरीस म्हणाले की, जर ते विजयी झाले, तर भारतीय वंशाच्या लोकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना व्हिसा आणि इतर सवलती दिल्या जातील. 

Image may contain: 1 person, plant, tree and outdoor

- हाफीज सईदवरून अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले; काय केली सूचना?

बॅलेट पेपरवरच मतदान

भारतामध्ये विधानसभा लोकसभा निवडणुकीवेळी मतदान हे ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याबाबत प्रचंड गोंधळ सुरू होता. मात्र, ब्रिटनमध्ये मतदान प्रक्रिया बॅलेट पेपरवरच घेण्यात आली. ख्रिसमस सण आणि लग्नसराईमुळे या सार्वजनिक सभागृहे आणि चर्चच्या ठिकाणी पोलिंग बूथ उभारण्यात आले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: United Kingdom votes to decide the fate of Brexit