संहारक शस्त्रे दहशतवाद्यांपर्यंत पोचण्याची शक्‍यता : भारत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 जून 2017

संयुक्त राष्ट्रसंघ: विनाशकारी आणि संहारक शस्त्रे दहशतवाद्यांपर्यंत पोचण्याच्या शक्‍यतेने भारताने संयुक्त राष्ट्रसंघात चिंता व्यक्त केली आहे. संहारक शस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती लागू नयेत, यासाठी सामूहिक प्रयत्न आणि समन्वय असणे गरजेचे आहे, असेही भारताने नमूद केले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय दहशतवादासंदर्भात आयोजित परिसंवादात भारताने आंतराष्ट्रीय दहशतवादांचा मुकाबला करण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलण्याची गरज बोलून दाखविली.

संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी राजदूत तन्मय लाल म्हणाले की, विनाशकारी शस्त्रांपर्यंत दहशतवादी संघटना पोचल्या असून, यापासून रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दहशतवादी संघटना दहशत निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत आहेत. महासंहारक शस्त्रांचा वाढत्या प्रसाराची जाणीव आपल्याला आहे. मात्र, शस्त्रांच्या व्यवहारात काही देशांची मिलीभगत असणे ही बाब चिंताजनक आहे. या गंभीर संकटाचा सामना हा प्रभावी तसेच सतत आंतराष्ट्रीय सहकार्य, समन्वय आणि देखरेखीच्या माध्यमातून करता येऊ शकतो. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी जागतिक कायद्यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करण्याची आवश्‍यकता असून, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली असल्याचेही लाल यांनी सांगितले.

Web Title: united nations news Weapons terrroist and india