अफगणिस्तानमधील अमेरिकेच्या हवाई तळावर हल्ला

यूएनआय
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

चार ठार; तालिबानने स्वीकारली जबाबदारी

काबूल - अफगणिस्तानमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर शनिवारी सकाळी शक्तिशाली बॉंबस्फोट झाला. यात चार जण ठार, तर 14 जण जखमी झाले. याद्वारे अमेरिकेची बलाढ्य सुरक्षा भेदल्याचा दावा करीत तालिबानने या स्फोटाची जबाबदारी घेतल्याचे "नाटो'ने सांगितले.

चार ठार; तालिबानने स्वीकारली जबाबदारी

काबूल - अफगणिस्तानमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर शनिवारी सकाळी शक्तिशाली बॉंबस्फोट झाला. यात चार जण ठार, तर 14 जण जखमी झाले. याद्वारे अमेरिकेची बलाढ्य सुरक्षा भेदल्याचा दावा करीत तालिबानने या स्फोटाची जबाबदारी घेतल्याचे "नाटो'ने सांगितले.

पाश्‍चिमात्य देशांना लक्ष्य केलेल्या तालिबानने उत्तर काबूलमधील बगराम हवाई तळाची भक्कम तटबंदी भेदून हा हल्ला केला. हा तळ म्हणजे अमेरिकेचा अफगणिस्तान सर्वांत मोठा लष्करी तळ आहे. "नाटो'ने दोन वर्षांपूर्वी येथील युद्धाला पूर्णविराम दिला. तेव्हापासून अफगणिस्तानमधील परिस्थिती खालावली असल्याचे या हल्ल्याने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यात ठार झालेले नागरिक कोणत्या देशाचे आहेत हे अद्याप समजलेले नाही. जखमींवर उपचार सुरू असून, या घटनेची चौकशी करण्याठी पथक नेमण्यात आले आहे, असे सांगण्यात आले.

परवान प्रांतात बगरामचा समावेश होतो. तेथील राज्यपाल वाहिद सिद्दिकी यांनी सांगितले, की हा स्फोट आत्मघातकी हल्लेखाराने केला. हवाई तळाच्या भोजनगृहात त्याने हा स्फोट घडवून आणला. मृत लोक कोणत्या देशाचे आहे हे समजले नाही, मात्र त्या भागात काम करणाऱ्या अफगाणी मजुरांपैकी एकाने हा हल्ला केला असावा असा अंदाज आहे. बगरामचे जिल्हाधिकारी अब्दुल शाकुर क्‍युड्युसी यांनी सांगितले का हा स्फोट शक्तिशाली होता. संपूर्ण परिसरात त्याचा प्रचंड आवाज ऐकायला आला. अमेरिका व "नाटो'चे अफगणिस्तानमधील कमांडर जॉन निकोलसन यांनी मृतांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन केले.

बगराम येथील आत्मघातकी हल्ल्यामागे बंडखोरांचा गट असून, यामुळे अमेरिकेच्या घुसखोरांची मोठी हानी झाल्याचा दावा तालिबानचा प्रवक्ता झबीउल्लाह मुजाहिद याने केला. बगराम हवाई तळ कायमच तालिबान्यांचे लक्ष्य ठरला आहे. डिसेंबर 2015 मध्ये येथे मोटारसायकस्वाराने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात अमेरिकेचे सहा सैनिक मारले गेले होते. परकी नागरिकांवर केलेला अफगणिस्तानमधील हा सर्वांत मोठा हल्ला होता.

Web Title: US air attack on the airport camp aphaganistan