esakal | चीनच्या माध्यमांवर अमेरिकेचे निर्बंध
sakal

बोलून बातमी शोधा

Media

चीन सरकारच्या अधिकृत माध्यमांविरोधात अमेरिकेने आणखी निर्बंध घातले असून त्यांच्या पाचही संस्थांच्या अमेरिकेतील कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची एकूण संख्या १६० हून १०० पर्यंत कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे या माध्यमांमधील साठ कर्मचाऱ्यांना अमेरिका सोडून मायदेशी परतावे लागणार आहे.

चीनच्या माध्यमांवर अमेरिकेचे निर्बंध

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वॉशिंग्टन - चीन सरकारच्या अधिकृत माध्यमांविरोधात अमेरिकेने आणखी निर्बंध घातले असून त्यांच्या पाचही संस्थांच्या अमेरिकेतील कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची एकूण संख्या १६० हून १०० पर्यंत कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे या माध्यमांमधील साठ कर्मचाऱ्यांना अमेरिका सोडून मायदेशी परतावे लागणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिन्हुआ न्यूज एजन्सी, चायना रेडिओ इंटरनॅशनल, चायना ग्लोबल टेलिव्हीजन नेटवर्क, चायना डेली आणि पीपल्स डेली या चीन सरकारचे नियंत्रण असलेल्या माध्यमांवर हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. इतर विदेशी संस्थांप्रमाणे या पाच संस्था स्वतंत्र नसून त्या चीन सरकारचे प्रतिनिधित्व करत असल्याने हा निर्बंध घातल्याचे अमेरिकेने म्हटले 
आहे. तसेच, चीनमध्ये काम करणाऱ्या अमेरिकी नागरिकांवर चीनने अनेक कडक निर्बंध घातले असून, त्यांच्यावर हेरगिरीही होत आहे, असा आरोपही अमेरिकेने केला आहे. अमेरिकेच्या या निर्णयावर चीनने संताप व्यक्त केला असून त्यावर चीन सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.