'मोदींचा हिंदू राष्ट्रनिर्मितीचा प्रयत्न'; अमेरिकेतल्या उद्योगपतीची टीका 

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत सोरॉस यांनी जागतिक, राजकीय आणि तांत्रिक घडामोडींबाबत अमेरिकी अब्जाधीश जॉर्ज सोरॉस यांनी आपली मते सांगितली.

दावोस : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदू राष्ट्र तयार करण्याचा प्रयत्न करीत असून, भारतातील मुस्लिमांवर नागरिकत्व गमविण्याची टांगती तलवार आहे, अशी टीका अमेरिकी अब्जाधीश जॉर्ज सोरॉस यांनी केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'हिंदू राष्ट्र निर्मितीचा प्रयत्न'
दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत सोरॉस यांनी जागतिक, राजकीय आणि तांत्रिक घडामोडींबाबत आपली मते सांगितली. राष्ट्रीयत्व या मुद्द्यावर बोलताना सोरॉस म्हणाले, 'राष्ट्रीयत्वाबाबतचा विचार फार वेगळ्या पद्धतीने केला जात असून, त्यापासून आता माघारी येणे अवघड झाले आहे. राष्ट्रीयत्वाच्या भावनेला सर्वांत मोठी ठेच भारतात बसली असून, लोकशाही मार्गाने निवडून आलेले नरेंद्र मोदी हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.' काश्‍मीरचा उल्लेख "अर्धस्वायत्त मुस्लीम भाग' असा उल्लेख करत सोरॉस यांनी, मोदी हे काश्‍मीरला शिक्षा करीत असून, येथील लाखो मुस्लिमांमध्ये नागरिकत्व गमाविण्याची भीती निर्माण झाली आहे, असा दावा केला आहे.

Image result for billionaire george soros statement against pm narendra modi '

आणखी वाचा - केजरीवालांचा अमित शहांना टोला; 'सर चार्जिंगची सुविधाही केलीय'

ट्रम्प यांनाही केले लक्ष्य
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याही धोरणांवर त्यांनी टीका केली. अत्यंत आत्मकेंद्री असलेले ट्रम्प हे अर्थव्यवस्थेवर मोठा ताण निर्माण करीत असून, तो फार काळ टिकून राहत नाही. हे सर्व ते निवडणूक जिंकण्यासाठी करीत असतील, तर निवडणूक अद्याप लांब आहे आणि बदल घडवून येण्यासाठी हा दीर्घ कालावधी आहे, असे ते म्हणाले. "ट्रम्प हे स्वार्थासाठी राष्ट्रहिताचा बळी देण्यास मागेपुढे पाहणार नाहीत आणि निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जातील. याउलट, अमेरिकेचा विरोधक असलेल्या चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे ट्रम्प यांच्या या कमकुवतपणाचा फायदा उठवीत असून, आपल्या जनतेवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने नियंत्रण ठेवत आहेत,' असे सोरॉस म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us based billionaire george soros statement against pm narendra modi