अमेरिकेत प्रवासी विमान गेले थेट नदीत

florida
florida

फ्लोरिडा : अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील जॅक्शनविले येथे बोईंग 737 हे प्रवासी विमान रनवेवरून घसरल्याने थेट नदीत गेल्याची घटना घडली आहे. विमानातील सर्व 140 प्रवाशी सुखरूप आहेत.

अमेरिकेत प्रवासी विमान नदीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फ्लोरिडातील जॅक्सनविलेमध्ये हे झाले असून, कोणतीही जीवितहानी न झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या विमानात 133 प्रवासी आणि 7 क्रू कर्मचारी होते. जॅक्सनविले येथील विमानतळावर विमान उतरत असताना सेंट जॉन्स नदीत ते कोसळले. 

या बाबतची माहिती मिळाल्यानंतर लगेच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com