फेसबुकवर शारीरिक अत्याचार लाईव्ह स्ट्रीम;1 अटकेत

वृत्तसंस्था
रविवार, 2 एप्रिल 2017

पीडित मुलीवर 5-6 मुलांनी शारीरिक अत्याचार केला असून या घटनेनंतर या मुलीच्या कुटूंबीयांनी स्थलांतर केले आहे. या प्रकरणानंतर पीडितेस ऑनलाईन माध्यमामधून धमक्‍याही मिळाल्या होत्या

शिकागो - अमेरिकेतील शिकागो येथे एका 15 वर्षीय मुलीवर करण्यात येत असलेला शारीरिक अत्याचार फेसबुकच्या माध्यमामधून लाईव्ह स्ट्रीम केल्याप्रकरणी येथील पोलिस दलाने एका 15 वर्षीय मुलास अटक केली आहे. या मुलाविरोधात चाईल्ड पोर्नोग्राफीसह इतर आरोप ठेवण्यात येत येणार असल्याची माहिती शिकागो पोलिस दलाचे प्रवक्ते अँथनी गुग्लीएल्मी यांनी दिली आहे.

या प्रकरणी लवकरच आणखी काही जणांना अटक केली जाण्याची शक्‍यता आहे. गेल्या महिन्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाची माहिती खुद्द पीडित मुलीच्या आईने येथील पोलिस अधीक्षक एडी जॉन्सन यांना दिली होती. जॉन्सन यांना पीडित मुलीच्या आईने यासंदर्भातील थेट चित्रीकरण दाखविले. यामुळे व्यथित झालेल्या जॉन्सन यांनी हे लाईव्ह स्ट्रिमींग 40 जण पाहत असतानाही कोणालाही या प्रकरणाची पोलिसांना माहिती द्यावीशी न वाटल्याने दु:ख व्यक्त केले होते.

पीडित मुलीवर 5-6 मुलांनी शारीरिक अत्याचार केला असून या घटनेनंतर या मुलीच्या कुटूंबीयांनी स्थलांतर केले आहे. या प्रकरणानंतर पीडितेस ऑनलाईन माध्यमामधून धमक्‍याही मिळाल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर, या प्रकरणी एकास झालेली अटक अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.

Web Title: U.S. boy of 14 arrested in sexual assault streamed live on FB