esakal | निवडून आल्यास कोरोनाची लस फुकट, ज्यो बायडेन यांचे भाजपच्या पावलावर पाऊल
sakal

बोलून बातमी शोधा

Presidential_Candidate_Joe

डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदावर ज्यो बायडेन यांनी 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत विजय झाल्यास सर्व अमेरिकी नागरिकांना कोरोना लस मोफतमध्ये देण्याचे वचन दिले आहे

निवडून आल्यास कोरोनाची लस फुकट, ज्यो बायडेन यांचे भाजपच्या पावलावर पाऊल

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- बिहार विधानसभेसोबतच अमेरिकेच्या निवडणुकाही जवळ आल्या आहेत. ज्या प्रकारे भाजपने बिहारमध्ये आपल्या वचननाम्यात कोरोना लस सर्व नागरिकांना मोफतमध्ये देणार असल्याचे जाहीर केले आहे, त्याचप्रमाणे अमेरिकेतही घोषणा करण्यात आली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदावर ज्यो बायडेन यांनी 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत विजय झाल्यास सर्व अमेरिकी नागरिकांना कोरोना लस मोफतमध्ये देण्याचे वचन दिले आहे. ज्यो बायडेन म्हणालेत की, जर ते राष्ट्रपती बनले तर सर्व नागरिकांना कोविड-19 लस मोफतमध्ये देण्याचे अनिवार्य करण्यात येईल. 

ज्यो बायडेन यांनी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ट्रम्प सरकार कोरोना महामारीविरोधात लढण्यास सपशेल अपयशी ठरले आहे. ट्रम्प यांनी कोरोना महामारीसमोर आत्मसमर्पन केले आहे. त्यांनी अमेरिकेला संकटात टाकले आहे. कोरोनावरील सुरक्षित आणि प्रभावी लस तयार झाली तर सर्व अमेरिकी नागरिकांना ती मोफतमध्ये देण्यात येईल, असं ते म्हणाले. अमेरिकीच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 10 दिवस शिल्लक राहिले असलाना बायडेन यांचे वक्तव्य आले आहे. 

हा तर 'हाऊडी मोदी'चा परिणाम; ट्रम्प यांच्या वक्तव्यावरुन सिब्बल यांचा...

बायडेन यांनी कोरोना मृत्यूच्या मुद्द्यावर ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. कोरोनामुळे जगात सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले. आतापर्यंत देशात 2,23,000 मृत्यू झाले आहेत. कोरोनासारखी महामारी जगाने इतिहासात कधी पाहिली नाही. आठ महिने झाले, कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. पण, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे कोणतीही योजना तयार नाही, असं ते म्हणाले आहेत. 

निवडणुकीत विजय झाल्यास सर्वात आधी राष्ट्रीय रणनीती लागू केली जाईल. त्याअंतर्गत कोरोना महामारीशी दोन हात करण्यासाठी मार्ग काढण्यात येईल. प्राथमिकतेने जनजीवन रुळावर आणण्याचे प्रयत्न केले जातील. यामध्ये 50 राज्यांच्या राज्यपालांचा विचार घेतला जाईल. सर्व ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य केले जाईल, असं बायडेन म्हणाले आहेत. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीने आपले घोषणापत्र जाहीर केले होते. यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरोना लशीसंबंधी मोठी घोषणा करण्यात आली होती. भाजपने घोषणा केलीये की, जर ते सत्तेत आले तर बिहारमध्ये सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफतमध्ये पुरवण्यात येईल. 

(edited by- kartik pujari)