अमेरिकेत चाललंय काय? चर्चमध्ये पुन्हा भीषण गोळीबार; एक ठार, दोन जखमी

US Firing in Stephens Episcopal church
US Firing in Stephens Episcopal churchesakal
Summary

अमेरिकेतील अलाबामा इथं भीषण गोळीबार झालाय.

अमेरिकेतील (America) अलाबामा इथं झालेल्या भीषण गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय, तर दोन जण जखमी झाले आहेत. बर्मिंगहॅम (Birmingham) येथील चर्चमध्ये ही घटना घडलीय. अलाबामा पोलिसांनी (Alabama Police) सांगितलं की, गुरुवारी चर्चमध्ये झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय.

वेस्ताविया हिल्स पोलिस विभागाचे कॅप्टन शेन वारे म्हणाले, 'चर्चच्या आत झालेल्या घटनेत तीन जणांना गोळ्या लागल्याची माहिती आम्हाला मिळालीय. दुर्दैवानं गोळी लागलेल्या लोकांपैकी एकाचा मृत्यू झालाय. ही घटना वेस्ताविया हिल्स येथील सेंट स्टीफन एपिस्कोपल चर्चमध्ये (St Stephen's Episcopal Church) संध्याकाळी 6.22 वाजता घडलीय. दोन जखमींना रुग्णालयात नेण्यात आलंय. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीय.

US Firing in Stephens Episcopal church
शर्मांची जीभ कापणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणा करणाऱ्या भीम सेनेच्या प्रमुखाला अटक

वारे पुढं माहिती देताना म्हणाले, सध्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलंय. परंतु, त्या संशयिताची अद्याप ओळख पटलेली नाहीय. चर्चच्या कॅलेंडरनुसार, शूटिंग सुरू असताना 'बूमर्स पॉटलक' नावाचा कार्यक्रम सुरू होता. उर्वरित माहिती नंतर देऊ, असं पोलिसांनी सांगितलंय. अमेरिकेत गोळीबार होणं ही आता सामान्य गोष्ट झालीय. एक दिवसापूर्वी ओहियोमध्ये कम्युनिटी सेंटरच्या बाहेरही गोळीबार झाला होता. यात एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले होते.

US Firing in Stephens Episcopal church
मोहम्मद पैगंबरांसाठी अमेरिकाही सरसावली; भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा केला निषेध

लॉस एंजेलिसमध्येही गोळीबार

तीन दिवसांपूर्वी, रविवारी अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये (Los Angeles) एका पार्टीदरम्यान झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला होता, तर चार जण जखमी झाले होते. लॉस एंजेलिस पोलिस विभागाचे प्रवक्ते जाडेर चावेस यांनी सांगितलं की, जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी दुपारी 12.30 च्या सुमारास लॉस एंजेलिसच्या बॉयल हाइट्समध्ये झालेल्या गोळीबारामागील हेतू काय होता, हे तपासकर्त्यांना अद्याप समजलेलं नाहीय. सध्या दोन जखमींची प्रकृती स्थिर असून चौथ्या व्यक्तीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com