दहशतवादाबद्दल अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले 

पीटीआय
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

वॉशिंग्टन (पीटीआय) : दहशतवादाविरोधात प्रभावी मोहीम पुन्हा सुरू करण्याची गरज असल्याचे अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातर्फे शुक्रवारी ही माहिती दिली. 

वॉशिंग्टन (पीटीआय) : दहशतवादाविरोधात प्रभावी मोहीम पुन्हा सुरू करण्याची गरज असल्याचे अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातर्फे शुक्रवारी ही माहिती दिली. 

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री महमूद कुरेशी व ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांची या आठवड्यात झालेल्या बैठकीत अमेरिकेकडून मिळणारी लष्करी मदत थांबविल्याबद्दलची चर्चा झाली. दहशतवाद्यांच्या कारवाया थांबविण्यास अपयश आल्याने पाकिस्तानची लष्करी मदत रोखण्याचा निर्णय अमेरिकेने जानेवारीत घेतला आहे. पाकिस्तान अमेरिकेला खोटेपणा व फसवणुकीशिवाय काहीही देत नाही. गेल्या 15 वर्षांत 33 अब्ज अमेरिकी डॉलरच्या बदल्यात पाकिस्तानने दहशतवाद्यांना सुरक्षितता पुरविली, असा आरोप ट्रम्प यांनी केला होता. 

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आम परिषदेला कुरेशी उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन आणि गृह मंत्रालयाचे सचिव माईक पॉम्पिओ यांची वॉशिंग्टन येथे भेट घेतली. या चर्चेची माहिती बोल्टन यांनी पत्रकार परिषदेत दिली. कुरेशी यांच्याबरोबरील बैठक सकारात्मक झाली, असे त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The US has aggressive on Pakistan about terrorism