जपानमधील नौदलाचे तळ अमेरिकेकडून बंद

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

जपानची राजधानी टोकियोपासून 980 किमी अंतरावर असलेल्या सासेबो येथे हा अमेरिकेचा नौदल तळ आहे.

टोकियो - गोळीबाराच्या शक्यतेमुळे अमेरिकेने जपानच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेले नौदलाचे तळ तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेच्या नौदल तळातील कमांडरांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (गुरुवार) सकाळी साडेनऊच्या सुमारास गोळीबाराचा आवाज झाला. त्यामुळे नौदलाचे तळ तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच हा तळ पूर्ववत सुरु होईल. गोळीबाराच्या ठिकाणची चौकशी करण्यात येत आहे.

जपानची राजधानी टोकियोपासून 980 किमी अंतरावर असलेल्या सासेबो येथे हा अमेरिकेचा नौदल तळ आहे. नौदल तळाच्या बिल्डींग 141 येथे गोळीबाराचा आवाज ऐकण्यात आला होता. मात्र, चौकशीनंतर कोठेही बंदुकधारी व्यक्ती घुसल्याचे दिसून आले नाही.

Web Title: U.S. naval base in western Japan on lockdown after reported shots