esakal | टिकटॉकसह चिनी सोशल मीडिया अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा अमेरिकेचा विचार
sakal

बोलून बातमी शोधा

mike pompeo

चिनी अ‍ॅप्सवर कसे निर्बंध घालायचे याचा तपशील माझ्याकडे नाही, पण तुमची खासगी माहिती चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या हातात पडावी असे वाटत असेल तरच लोकांनी ती अॅप डाऊनलोड करावीत.
- माईक पॉम्पिओ, अमेरिकी परराष्ट्र मंत्री

टिकटॉकसह चिनी सोशल मीडिया अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा अमेरिकेचा विचार

sakal_logo
By
यूएनआय

न्यूयॉर्क - टिकटॉकसह चिनी सोशल मीडिया अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा अमेरिकेचा नक्कीच विचार असल्याचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी सोमवारी स्पष्टपणे सांगितले. चीनची आर्थिक नाकेबंदी करण्याच्या उद्देशाने भारताने अशी पावले उचलल्यानंतर अमेरिकाही पुनरावृत्ती करण्याची दाट शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनला आपल्या भूमिकेचा फेरविचार करण्यास भाग पाडण्याचा यामागील हेतू आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पॉम्पिओ यांनी फॉक्स न्यूजला त्यांनी मुलाखत दिली. ते म्हणाले की, आम्ही याकडे अतिशय गंभीरपणे पाहत आहोत. मी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गांभीर्याने लक्ष घातले आहे. दीर्घ काळापासून आम्ही यावर काम करीत आहोत. 

पॉम्पीओ यांनी गेल्या आठवड्यात भारताच्या निर्णयाची प्रशंसा केली होती. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या हेरगिरीसाठी ही अ‍ॅप्स पूरक ठरू शकतात. त्यामुळे अशी अ‍ॅप काढून टाकण्यामुळे भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि राष्ट्रीय सुरक्षा भक्कम होईल, असे ते म्हणाले होते. कोरोनाबद्दल ट्रम्प यांनी चीनला जाहीरपणे दोषी धरले आहे.

चिनी अ‍ॅप्सवर कसे निर्बंध घालायचे याचा तपशील माझ्याकडे नाही, पण तुमची खासगी माहिती चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या हातात पडावी असे वाटत असेल तरच लोकांनी ती अॅप डाऊनलोड करावीत.
- माईक पॉम्पिओ, अमेरिकी परराष्ट्र मंत्री