
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे.
वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. ट्रम्प यांच्याविरोधात दुसऱ्यांदा महाभियोगाची कारवाई करण्यात आली आहे. अमेरिकेच्या काँग्रेसमधील प्रतिनिधिगृहात म्हणजेच कॅपिटॉल हिल येथील हिंसाचारप्रकरणाचा ठपका ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आला आहे. महाभियोगावरील चर्चेनंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राष्ट्राध्यक्षावर दुसऱ्यांदा महाभियोग प्रस्ताव दाखल होण्याची नामुष्की ओढावली आहे. आतापर्यंत अँड्रयू जॉनसन, बिल क्लिंटन यांच्याविरोधात महाभियोग आणण्यात आला आहे.
लोकल प्रवासासाठी सामान्य नागरिक अजूनही वेटिंग लिस्टमध्ये
ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव 197 विरोधात 232 मतांनी मंजूर झाला. विशेष म्हणजे 10 रिपब्लिकन खासदारांनी देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात मतदान केलं आहे, तर चार जण तटस्थ राहिले. आता सीनेटमध्ये पुढील प्रक्रिया चालणार आहे. 19 जानेवारीला सिनेटमध्ये हा प्रस्ताव आणला जाईल.
रिपब्लिकच्या 10 खासदारांनी केले मतदान
- लिज़ चेनी (WY)
- अँथोनी गोंजालेज (OH)
- जेमी हेरेरा बेउटलर (WA)
- जॉन काटको (NY)
- अॅडम किंजिंगर (IL)
- पीटर मीजर (MI)
- डैन न्यूहाउस (WA)
- टॉम राइस (SC)
- फ्रेड अप्टन (MI)
- डेविड वलदो (CA)
शेतकरी आंदोलनामुळे रस्त्यावर अडकली लस घेऊन जाणारी ट्रक; बदलावा लागला मार्ग
अमेरिकेत दुपारी साडेचारच्या दरम्यान (भारतीय वेळेनुसार पहाटे तीनच्या दरम्यान) हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. अमिरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांचा शपथविधी 20 जानेवारीला पार पडणार आहे. त्यामुळे शपथविधी सोहळ्याला एका आठवडा शिल्लक राहिला असताना महाभियोग चालवण्यास मंजुरी मिळाली आहे.
दरम्यान, पोलिसांपेक्षा अधिक संख्येने असलेल्या ट्रम्प समर्थकांनी थेट कॅपिटॉलची सुरक्षा यंत्रणा भेदून आत घुसखोरी करत तोडफोड केली होती. या समर्थकांचा पोलिसांबरोबर संघर्ष झाला. या संघर्षात एका महिलेसह चौघांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी अनेक जणांना अटकही केली. या हिंस एका पोलिसालाही आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेमुळे ट्रम्पविरोधात वातावरण तयार झालं होतं.