esakal | ट्रम्प यांचा चीनला धक्का; तिबेटला निवडता येणार दलाई लामांचा उत्तराधिकारी
sakal

बोलून बातमी शोधा

china america

खवळलेल्या चीनने आणि त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा कायदा म्हणजे चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचं म्हटलं होतं. 

ट्रम्प यांचा चीनला धक्का; तिबेटला निवडता येणार दलाई लामांचा उत्तराधिकारी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

वॉशिंग्टन - चीन आणि अमेरिका यांच्यात तणावाचं वातावरण असताना आणि चीनकडून मिळणाऱ्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तिबेटला स्वतंत्र हक्क देणाऱ्या एका कायद्यावर स्वाक्षरी केली. यामुळे तिबेटला त्यांच्या धर्मगुरुचे पुढचे उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार मिळतो. द तिबेट पॉलिसी अँड सपोर्ट अॅक्ला अमेरिकेच्या काँग्रेसनं गेल्याच आठवड्यात मंजुरी दिली होती. यामुळे खवळलेल्या चीनने आणि त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा कायदा म्हणजे चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचं म्हटलं होतं. 

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता वेनबिन यांनी गेल्या आठवड्यात हे विधेयक मंजुर झाल्यानंतर म्हटलं होतं की, आम्ही अमेरिकेला आग्रह करतो की, त्यांनी चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष घालू नये आणि या कायद्यावर स्वाक्षरी करू नये. असं होऊ नये की यामुळे भविष्यात द्विपक्षीय संबंधावर परिणाम होईल. 

सोमवारी नवीन कायदा लागू होण्याच्या बातमीनंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं की, बिजिंग अमेरिकेच्या या कायदाला स्वीकारत नाही आणि तिबेटशी संबंधित मुद्दे हे आमचे अंतर्गत मुद्दे आहेत. 

हे वाचा - चहातून दिलं विष; Game Of Thrones च्या डेव्हलपरचा खून

अमेरिकेच्या कायद्यात तिबेटच्या शहब ल्हासामध्ये अमेरिकन दुतावास उघडण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच असंही म्हटलं की, तिबेटला 14 व्या दलाई लामांचा उत्तराधिकारी निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. दुसऱीकडे दलाई लामा यांना फुटीरतावादी, धोकादायक म्हणणाऱ्या चीनकडून तिबेटच्या धर्मगुरूच्या निवडीत आमची परवानगी गरजेची आहे. तिबेटकडून चीनची ही मागणी फेटाळून लावली जात आहे. 

अमेरिकेनं मंजुरी दिलेला नवा कायदा काय सांगतो?
नव्या कायद्यांतर्गत तिबेटच्या प्रकरणांमध्ये अमेरिकेच्या विशेष राजदूतांना हा अधिकार देण्यात आला आहे की पुढच्या दलाई लामांची निवड फक्त तिबेट बौद्ध समुदायाकडून करण्यात यावी. हे निश्चित कऱण्यासाठी ते आंतरराष्ट्रीय स्तरावर आघाडी करू शकतात. यामध्ये तिबेटमध्ये तिबेटी समुदायांच्या समर्थनासाठी एनजीओंच्या मदतीचा प्रस्तावसुद्धा आहे. 

हे वाचा - हट्टी ट्रम्प यांची 900 बिलियन डॉलरच्या बिलावर सही, नागरिकांचा चेक वटण्याचा मार्ग मोकळा

भारताने दलाई लामांना दिला होता आश्रय
तिबेटवर चीनने हल्ला केला होता तेव्हा दलाई लामा हे 1959 मध्ये भारताच्या आश्रयाला आले होते. त्यांच्यासोबत हजारो अनुयायी हिमाचल प्रदेशातील धर्मशाला इथं राहत होते. सध्या जवळपास 80 हजार तिबेटियन भारतात राहतात. याशिवाय जगभरात, विशेषत: अमेरिका, युरोपातही जवळपास दीड लाखांहून अधिक तिबेटियनांनी आश्रय घेतला आहे. 

loading image