अमेरिका-रशियाच्या धुसफूसीदरम्यान बायडन-पुतिन यांचं हस्तांदोलन

अमेरिका-रशियाच्या धुसफूसीदरम्यान बायडन-पुतिन यांचं हस्तांदोलन

जिनिव्हा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सध्या जिनेव्हामध्ये राजनैतिक विषयांवरील चर्चेस सुरुवात करत आहेत. स्वित्झर्लंडच्या राष्ट्राध्यक्षांनी सर्वांत आधी दोघांना अभिवादन केलं त्यानंतर एक मीटिंग आयोजित केली. या बैठकीत बायडन आणि पुतिन यांच्याशिवाय अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावारोव देखील होते. या बैठकी दरम्यानची पुतिन आणि बायडन यांचा एक फोटो देखील समोर आला आहे. या फोटोमध्ये ते दोघेही हात मिळवताना दिसून येत आहेत. (US President Joe Biden and Russian President Vladimir Putin shake hands kicking off Geneva summit)

अमेरिका-रशियाच्या धुसफूसीदरम्यान बायडन-पुतिन यांचं हस्तांदोलन
'वैज्ञानिक तथ्यांच्या आधारेच वाढवलं दोन डोसमधील अंतर'

या भेटीसाठीच्या पुढाकारासाठी पुतिन यांनी बायडन यांचे आभार मानले आहेत. अमेरिका आणि रशियाच्या संबंधामधील संबंधांमध्ये बरेच असे मुद्दे आहेत ज्यासाठी उच्च-स्तरीय बैठक आवश्यक आहे. आपल्या या बैठक सत्कारणी लागेल अशी आशा आहे, असंही पुढे त्यांनी म्हटलंय. बायडन यांनी या बैठकीसाठी फक्त पुढाकारच घेतला नाहीये तर त्यांनी पहिल्यांदाच पुतिन यांच्याशी हस्तांदोलन करताना हसत म्हटलंय की, समोरासमोर भेटणं कधीही चांगलंच असतं.

अमेरिका-रशियाच्या धुसफूसीदरम्यान बायडन-पुतिन यांचं हस्तांदोलन
विद्यार्थ्यांच्या जामिनाविरोधात दिल्ली पोलीस सुप्रीम कोर्टात

आता या दोघांमध्येही उच्चस्तरिय चर्चा होईल, ज्यामध्ये इतरही वरिष्ठ सहकारी सामील होणार आहेत. असं म्हटलं जातंय की, ही बातचित साधारण पाच तासांपर्यंत सुरु राहिल. बायडन आणि पुतिन सायबर हल्ले, रशियाचा अमेरिकेच्या निवडणुकीतील कथित हस्तक्षेप, शस्त्र नियंत्रण आणि रशियाच्या युक्रेनमध्ये हस्तक्षेप यांसारख्या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. बायडन आणि पुतिन यांच्या या भेटीमुळे अमेरिका आणि रशिया दरम्यानच्या बिघडलेल्या नातेसंबंधात सुधारणा होईल, अशी आशा वर्तवली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com