मुंबई २६/११ हल्ल्यातील दोषी राणाची जामीन याचिका अमेरिकेने फेटाळली 

कार्तिक पुजारी
Saturday, 25 July 2020

अमेरिकेने २००८ सालच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात दोषी असणाऱ्या तहव्वुर राणा याची जामीन याचिका फेटाळून लावली आहे.

नवी दिल्ली- अमेरिकेने २००८ सालच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात दोषी असणाऱ्या तहव्वुर राणा याची जामीन याचिका फेटाळून लावली आहे. राणा हा मूळ पाकिस्तानचा कॅनडातला व्यावसायिक आहे. डेविड कोलमैन हेडली याचा दोस्त राणा(५९) मुंबईतील २६/११ हल्लात सामिल होता. भारताच्या प्रत्यार्पनाच्या विनंतीमुळे त्याला १० जून रोजी अमेरिकेतील लॉस एंजिलिस येथे अटक करण्यात आली होती. भारताने राणा याला फरार घोषीत केले आहे.

मुंबईतील २६/११ हल्ल्यात ६ अमेरिकी नागरिकांसह १६६ लोकांचा मृत्यू झाला होता. लॉस एंजिलिसमधील अमेरिकी डिस्ट्रिक्ट न्यायालयात न्यायाधीश जैकलीन चूलजियान यांनी आपल्या २४ पाणी आदेशानुसार राणा याला जामीन देण्यास नकार दिला. तसेच राणा फरार झाल्यास मोठा धोका आहे. राणा याला जामीन देण्यात आला तर तो कॅनडामध्ये पळून जाईल आणि त्यामुळे भारतात होणाऱ्या फाशीच्या शिक्षेपासून त्याला वाचता येईल, असं अमेरिकी न्यायालयाने म्हटलं आहे.

चीनच्या अडचणी वाढल्या; अणू केंद्रातील ९० वैज्ञानिकांनी दिला राजीनामा
कोणत्याही परिस्थितीत राणा याला जामीन दिला जाऊ शकत नाही. त्याला जामीन दिल्यास अमेरिकेला आपल्या परदेशी संबंधांबाबत लज्जा वाटू शकते. शिवाय अमेरिकेचे भारतासोबतचे संबंध तणावपूर्ण होऊ शकतात, असं अमिरेकेचे सहाय्यक अॅटर्नी जॉन जे लुलेजियान यांनी न्यायालयात म्हटलं. तर राणाचे वकील म्हणाले की, २६/११ प्रकरणातील आरोपी फरार होण्याची कोणतीही शक्यता नाही. शिवाय त्याच्या जामीनासाठी १५ लाख डॉलर देण्याची आमची तयारी आहे. 

कोण आहे तहव्वुर राणा

पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या राणाने तेथील आर्मी मेडिकल कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. शिवाय अनेक वर्षे त्याने पाकिस्तानी सैन्यात डॉक्टरचे काम केले आहे. तो सध्या कॅनडाचा नागरिक आहे. मात्र, तो शिकागोमध्ये राहत आहे. येथे त्याचा व्यवसाय आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रानुसार, राणा कॅनडा, पाकिस्तान, जर्मनी आणि इंग्लंडमध्येही राहतो. येथे त्याचे येणे-जाणे सुरु असते. शिवाय तो सात भाषा बोलतो. 

165 कोटींची लॉटरी लागल्यावर निभावली मैत्री, 28 वर्षांपूर्वी दिलं होतं वचन
राणा कॅनडात पळून गेला तर तो मृत्यूदंडाच्या शिक्षेपासून वाचू शकतो. कारण, अशाप्रकारची तरतूद भारत आणि कॅनडाच्या प्रत्यार्पन करारात आहे. यानुसार, प्रत्यार्पनासाठी मागणी केलेल्या गुन्हेगाराला भारतात फाशीची शिक्षा होणार असेल तर अशा गुन्हेगाराच्या प्रत्यार्पनासाठी कॅनडा  नकार देऊ शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US rejects Ranas bail plea in Mumbai attacks