भारताच्या शस्त्रखरेदीत वाढ; अमेरिकेचा अहवाल

पीटीआय
Friday, 11 December 2020

भारतातर्फे अमेरिकेकडून केल्या जाणाऱ्या शस्त्रखरेदीत प्रचंड वाढ झाली असल्याचे अमेरिकेत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालातून दिसून आले आहे. भारताकडून केली जाणारी खरेदी ६२ कोटी डॉलरवरून थेट ३.४ अब्ज डॉलरपर्यंत वाढली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

वॉशिंग्टन - भारतातर्फे अमेरिकेकडून केल्या जाणाऱ्या शस्त्रखरेदीत प्रचंड वाढ झाली असल्याचे अमेरिकेत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालातून दिसून आले आहे. भारताकडून केली जाणारी खरेदी ६२ कोटी डॉलरवरून थेट ३.४ अब्ज डॉलरपर्यंत वाढली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमेरिकेतील संरक्षण सुरक्षा सहकार्य संस्थेने (डीएससीए) हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार, अमेरिकेकडून इतर देशांना होणाऱ्या शस्त्रविक्रीत घट झाली असताना भारताला मात्र मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यात आली. २०१९ मध्ये अमेरिकेने ५५.७ अब्ज डॉलरची शस्त्र विक्री केली होती. ती यंदा ५०.८ अब्ज डॉलरपर्यंत खाली आली होती. 

Image may contain: text that says "अमेरिकेकडून सर्वाधिक शस्त्रे घेणारे देश (आकडे डॉलरमध्ये) देश २०२० २०१९ ३.४ अब्ज ४.५ अब्ज भारत मोरोक्को पोलंड सिंगापूर तैवान यूएई ६२ लाख १.२४ कोटी ६७.३ कोटी १३.७ कोटी ८७.६ कोटी ४.७ अब्ज १.३ अब्ज ११.८ अब्ज १.१ अब्ज ३.६ अब्ज"

जो बायडन- कमला हॅरिस 'टाइम पर्सन ऑफ द इअर'ने सन्मानित

भारत, मोरोक्को आणि इतर काही देशांकडून होणाऱ्या खरेदीत वाढ झाली असली तरी सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, बेल्जियम, इराक या देशांनी अमेरिकेकडून गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी खरेदी केली आहे.

Pfizer-BioNTech कंपन्यांवर सायबर हल्ला; कोरोना लशीसंदर्भातले डॉक्यूमेंट्स हॅक

भारताकडून खरेदीत वाढ
भारताने अमेरिकेकडून २०१७ मध्ये ७५.४४ कोटी डॉलरची शस्त्र खरेदी केली होती. २०१८ मध्ये २८.२ कोटी डॉलरचे शस्त्र खरेदी केले. १९५० ते २०२० या काळात अमेरिकेने भारताला १२.८ अब्ज डॉलरचे शस्त्र विकले आहेत. अमेरिकेने २०१६ मध्ये भारताला प्राधान्यक्रम दिल्याने अधिक खरेदी करणे भारताला शक्य झाले आहे. पाकिस्तानबरोबरील संबंध तणावाचे झाले असले तरी अमेरिकेने त्यांनाही शस्त्रे विकली आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US reports increase in Indias arms purchases