‘हायपरसॉनिक’ची अमेरिकेकडून चाचणी

अमेरिकेने अत्याधुनिक हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी गेल्या महिन्यात गुप्तपणे केल्याचे उघडकीस आले
US test of hypersonic missiles Air Breathing Weapon Concept Washington
US test of hypersonic missiles Air Breathing Weapon Concept Washingtonsakal

वॉशिंग्टन : अमेरिकेने अत्याधुनिक हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी गेल्या महिन्यात गुप्तपणे केल्याचे उघडकीस आले आहे. या क्षेपणास्त्राला ‘हायपरसॉनिक एअर ब्रिदिंग वेपन कन्सेप्ट’ असे नाव देण्यात आले आहे. रशियाकडून युक्रेनवरहायपरसॉनिक (स्वनातीत) क्षेपणास्त्रांचा मोठा मारा होत आहे. त्यात युक्रेनची मोठी हानी होत आहे. या युद्धात अमेरिका प्रत्यक्ष उतरली नसली तरी तिने युक्रेनचे जाहीर समर्थन केले आहे. भविष्यात रशिया व चीनला तोडीस तोड उत्तर देण्याची तयारी अमेरिका करीत असून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी हा त्याचाच एक भाग आहे.

रशिया व चीन अणुबाँबचा हल्ला करण्यास सक्षम हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तयार करीत आहेत तर अमेरिकेच्या शस्त्रताफ्यात त्याची कमतरता आहे. यासाठीच त्यांनी पश्‍चिम किनारपट्टीवर ‘बी-५२एच’ या अण्वस्त्र बाँबरच्या मदतीने ‘हायपरसॉनिक’ची चाचणी गेल्या महिन्यात केली. युक्रेन व रशियातील युद्ध तणावामुळे हा चाचणी गुप्तपणे करण्‍यात आल्याचे सांगण्यात आले.

अमेरिकी हवाई दलानुसार...

  • क्षेपणास्त्राचा वेग वाढविण्यासाठी त्यात रॉकेट बूस्टरचा वापर करण्याचे नियोजन

  • चाचणीत क्षेपणास्त्र ६५ हजार फुटापेक्षा जास्त उंच गेले

  • क्षेपणास्त्राने ५०० किलोमीटर अंतर कापले

  • जमिनीवर हल्ला करण्यासाठी या क्षेपणास्त्राची निर्मित

  • नौदलासाठीही हायपरसॉनिक क्षेपणास्त्र बनविण्याची तयारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com