चाचण्या थांबवा; चर्चेला परता अमेरिकेचे उत्तर कोरियाला आवाहन

उत्तर कोरियाने क्षेपणास्त्राच्या चाचण्या थांबवाव्यात आणि चर्चेसाठी परतावे असे आवाहन अमेरिकेने केले आहे. गेल्या आठवड्यात पाणबुडीतून क्षेपणास्त्राची चाचणी घेतली
north koria us
north koria ussakal media

वॉशिंग्टन : उत्तर कोरियाने क्षेपणास्त्राच्या चाचण्या थांबवाव्यात आणि चर्चेसाठी परतावे असे आवाहन अमेरिकेने केले आहे. गेल्या आठवड्यात पाणबुडीतून क्षेपणास्त्राची चाचणी घेतली.हे क्षेपणास्त्र नव्याने विकसित करण्यात आले आहे. गेल्या काही आठवड्यांत उत्तर कोरियाने केलेली ही पाचवी चाचणी आहे. सुमारे दोन वर्षांच्या खंडानंतर समुद्राच्या पाण्याखालून अशी चाचणी प्रथमच करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर उत्तर कोरीयासाठीचे विशेष दूत सुंग किम यांनी दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, उत्तर कोरियाने चाचण्या करण्यापासून परावृत्त व्हावे. त्यांनी अशा प्रकारे चिथावणी देणे थांबवावे. अस्थिरता निर्माण करणाऱ्या कारवाया टाळाव्यात. कोणतीही पूर्वअट न घालता उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांशी भेटण्यास आम्ही तयार आहोत. त्यांच्याविरुद्ध अमेरिकेच्या मनात शत्रुत्वाची कोणतीही भावना नाही.

उत्तर कोरियाने अशा चाचण्या केल्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील ठरावांचा भंग झाला आहे. या चाचण्यांमुळे आंतरराष्ट्रीय समुदायाला धोका निर्माण झाल्याचा तसेच कोरियन द्वीपकल्पात शांततेला चालना देण्याच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे, असेही किम यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com