अमेरिकेच्या व्हिसासाठी सोशल मिडीयाच्या माहितीची अट

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 मार्च 2018

व्हिसासाठी अर्जदारांना आपल्या सोशल मिडीयावरील सर्व प्लॅटफोर्मच्या वैयक्तिक अकाऊंटचे तपशिल द्यावे लागतील. त्याचबरोबर यापूर्वी पाच वर्ष वापरलेल्या फोन नंबरची यादीही द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर चालू ई-मेल आयडी व यापूर्वी वापरलेल्या आयडीचे तपशिलही द्यावे लागतील.

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या प्रशासनाने व्हिसा मिळण्याच्या प्रक्रियेत बदल केले असून, आता व्हिसा मिळवण्यासाठी अर्जदारांच्या वैयक्तिक सोशल मिडीया अकाऊंटबद्दल माहितीही मागितली जाणार आहे. त्याबरोबरच पूर्वीचा फोन नंबर, ई-मेल आयडी यांचे तपशिलही व्हिसा अर्जदारांना द्यावे लागतील. हा व्हिसा मिळवण्याच्या परिक्षण प्रक्रियेचा भाग असेल. अमेरिकेसाठी अडथळा ठरणाऱ्यांसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही पावले प्रशासनाने उचलली आहेत.

flag america

गुरूवारी फेडरल रजिस्टर या अधिकृत कागदपत्रात सांगितल्याप्रमाणे, अमेरिकेत नॉन-इमिग्रंट (कायम वास्तव्यासाठी) व्हिसाच्या अर्जदारांना नवीन नियमांप्रमाणे विचारण्यात येणाऱ्या सर्व गोष्टींचे तपशील द्यावे लागतील. नवीन नियमांप्रमाणे साधारण 7,10,000 इमिग्रंट व 1.4 कोटी नॉन-इमिग्रंट अर्जदारांना या प्रक्रियेत व्हिसा मिळेल. 

व्हिसासाठी अर्जदारांना आपल्या सोशल मिडीयावरील सर्व प्लॅटफोर्मच्या वैयक्तिक अकाऊंटचे तपशिल द्यावे लागतील. त्याचबरोबर यापूर्वी पाच वर्ष वापरलेल्या फोन नंबरची यादीही द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर चालू ई-मेल आयडी व यापूर्वी वापरलेल्या आयडीचे तपशिलही द्यावे लागतील. तसेच यापूर्वी अर्जदाराला कोणत्या देशातून हद्दपार करण्यात आले आहे का, त्याच्या घरातील सदस्यांचे किंवा त्याचे काही वादग्रस्त लोकांशी लागेबांधे आहेत का याचीही चौकशी आता होणार आहे, असे जाहिर केलेल्या पत्रात म्हणले आहे. 

'अर्ज भरतना सोशल मिडीया संबंधित प्रश्नांची एक यादी असेल, ती भरावी त्याचबरोबर त्याचे अधिकृत तपशिल द्यावे' असे या पत्रकात सांगण्यात आले आहे. ही माहिती मिळाल्यानंतर ती, व्हिसा वितरण विभागाकडे पाठविण्यात येईल व तिचे नवीन नियमांप्रमाणे परिक्षण करण्यात येईल. या सुधारित अर्जात वैद्यकीय तपासणीसंदर्भात अतिरिक्त माहिती देखील समाविष्ट असेल. 

आता भारतातील व्हिसा संबंधित सर्व प्रक्रिया मुंबईत -

व्हिसाशी संबंधित सर्व प्रक्रिया मुंबई येथील केंद्रावर होणार असल्याने दिल्लीतील अमेरिकी दूतावासाकडून येत्या एक एप्रिलपासून आयआर 5, आयआर 1, आयआर 2, सीआर 1 किंवा सीआर 2 या व्हिसांवर प्रक्रिया होणार नाही.

त्यामुळे अमेरिकी नागरिकाचे पालक, पत्नी अथवा अल्पवयीन अपत्य यांना अमेरिकेत स्थलांतर करण्याच्या दृष्टीने व्हिसा मिळविण्यासाठी आता मुंबई गाठावी लागणार आहे.

ज्या व्यक्तींना दिल्लीतील कार्यालयाने मुलाखतीसाठी एक एप्रिलनंतरची तारीख पूर्वीच दिली असेल, त्यांना पत्र पाठवून नवे ठिकाण कळविले जाईल, असे अमेरिकी दूतावासातर्फे सांगण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US wants visa applicants to submit phone and social media details