आता भारतावर हल्ला झाला; तर...; पाकिस्तानला भरला सज्जड दम!

Donald Trump
Donald Trump

वॉशिंग्टन : अमेरिकेने पाकिस्तानला यंदा गंभीर इशारा दिला असून, भारतावर आता आणखी एका दहशतवादी हल्ला झाला तर ते पाकिस्तानसाठी चांगले असणार नाही.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे, की भारतावर आणखी एखादा दहशतवादी हल्ला झालातर पाकिस्तानसाठी हे खूप कठीण असणार आहे. भारताने आपल्या सुरक्षेसाठी दहशतवादी तळावर एअरस्ट्राइक केला, जो त्यांचा अधिकार आहे. भारताने पुन्हा असे केले तर पाकिस्तानसाठी खूप वाईट असेल. 

अमेरिकेच्या अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले, की पाकिस्तानच्या मदतीशिवाय भारतात कोणताच हल्ला होऊ शकत नाही. दहशतवादी कारवायांमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढत आहे. पाकिस्तानने दहशतवादी संघटनांवर कायमस्वरूपी कारवाई केली पाहिजे. जैशे महंमद आणि लष्करे तैयबा यासारख्या दहशतवादी संघटनांवर कारवाई करायला हवी. दोन्ही देशांमधील तणाव हा दोघांसाठी धोकादायक आहे. 

काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोटमध्ये एअरस्टाइक केला होता. यानंतर या दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com