महात्मा गांधी पुतळा विंटबनेवर व्हाइट हाउसने दिली प्रतिक्रिया

mahatma gandhi
mahatma gandhi

वॉशिंग्टन - सहा महिन्याच्या कालावधीत दोन वेळा अमेरिकेतल्या भारतीय दुतावासाबाहेर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना झाली. या घटनेची दखल आता व्हाइट हाऊसने घेतली आहे. भारतीय दूतावासाबाहेर असणाऱ्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची झालेली विटंबना ही खेदाची बाब आहे. त्यांच्या प्रतिष्ठेचा आदर केला पाहिजे आणि त्यातही अमेरिकेच्या राजधानीत तो व्हायलाच हवा असं व्हाइट हाउसच्या प्रवक्त्या कॅली मॅननॅनी यांनी म्हटलं. 

भारतातील कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अमेरिकेतील तरुणांनी तिथं आंदोलन केलं होतं. शनिवारी झालेल्या या आंदोलनावेळी काही समाजकंटकाच्या एका गटाने भारतीय दूतावासाबाहेर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विंटबना केली. त्याबाबत पत्रकार परिषदेत विचारले असता मॅकनॅनी यांनी म्हटलं की, हे खूपच वाईट आहे. कोणत्याही पुतळ्याची किंवा स्मारकाची अशी मोडतोड होऊ नये. शांतता, न्याय आणि स्वांतंत्र्य यासाठी लढलेल्या गांधीजींसारख्या महान व्यक्तीच्या पुतळ्याबाबत असं अनेकदा घडणं ही खेदाची बाब आहे. अमेरिकेत असलेल्या परदेशी दूतावासांना सुरक्षा पुऱवण्याच्या गोष्टीकडे आम्ही गांभीर्याने घेत असल्याचंही त्यांनी सांगितले. 

अमेरिकेतील न्यूयॉर्क, न्यूजर्सी, पेनसिल्व्हानियासह अनेक राज्यातून शेकडो शीख नागरिकांना वॉशिंग्टन डीसी इथं भारतीय दूतावासापर्यंत कार रॅली काढली होती. त्यावेळी भारत विरोधी पोस्टर आणि खलिस्थानी झेंडे घेऊन काही आंदोलक तिथे पोहोचले होते. त्यातील खलिस्तानी समर्थकांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यावर एक पोस्टर चिटकवले आणि खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. 

दरम्यान, या घटनेबद्दल भारतीय दूतावासाने तीव्र असा निषेध व्यक्त केला. भारतीय दूतावासाने म्हटलं की, या प्रकरणी अमेरिकेत तीव्र नाराजी व्यक्त केली असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल. शनिवारी जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा वॉशिंग्टन डीसी पोलिस आणि गुप्तचर विभागाचे कर्मचारी याठिकाणी उपस्थित होते. 

अमेरिकेत याआधी वर्णद्वेषाविरोधात आंदोलन सुरु असताना महात्मा गांधींच्या पुतळ्याची विंटबना करण्यात आली होती. तेव्हा या कृत्यामागे ब्लॅक लाइव्हज मॅटरचे आंदोलन होते असा आरोप केला होता. तर काहींनी या आंदोलनाविरोधात असलेल्या लोकांकडून हे कृत्य झाल्याचं म्हटलं गेलं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com