US Election: बहुमताने निवडला जात नाही अमेरिकेचा अध्यक्ष; जाणून घ्या कसा लागतो निकाल

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 27 September 2020

डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा राष्ट्रपतीपदी विराजमान होण्याची संधी असली तरी बायडेन यांना लोकांना पाठिंबा मिळताना दिसत आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका (US elections) काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आमनेसामने आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा राष्ट्रपतीपदी विराजमान होण्याची संधी असली तरी बायडेन यांना लोकांना पाठिंबा मिळताना दिसत आहे. अशात अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल कसा लागतो हे आपण जाणून घेऊया.

पाण्यात सापडला मेंदू खाणारा अमिबा; अमेरिकेच्या टेक्सासमधील पाणी पुरवठा बंद

अमेरिकेत राष्ट्रपतीची निवड लोकांनी दिलेल्या मतांपेक्षा 'इलेक्टोरल कॉलेज'वर अवलंबून असते. निवडणुकीत उमेदवार हे थेटपणे निवडले जातात. पण, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना थेटपणे लोक निवडून देत नाहीत. राज्यातील लोक हे इलेक्टोरल कॉलेजच्या सदस्यांसाठी मतदान करत असतात. त्यानंतर हे इलेक्टर्स (electors)  राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडून देतात. या पद्धतीला इलेक्टोरल कॉलेज (Electoral College) असं म्हटलं जातं. इलेक्टर्स निर्धारित करण्याची प्रक्रिया संविधानात देण्यात आली आहे.  

Map of the U.S. showing the number of electoral college votes by state.

संपूर्ण देशात एकूण 538 इलेक्टर्स आहेत, जे राष्ट्रपती निवडतात. 2016 च्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना 306 इलेक्टोरल मत मिळाले होते, तर विरोधक हिलरी क्लिंटन यांना 232 मते मिळाली होती. राष्ट्रपती बनण्यसाठी 270 मतांची आवश्यकता असते. एकूण मतांकडे पाहिले तर क्लिंटन यांना 48.2 टक्के मते मिळाली होती, तर डोनाल्ड ट्रम्प यांना 46.1 टक्के मते मिळाली होती. 

Coronavirus : भारतात कोरोना रुग्णांमध्ये वाढ पण, WHOकडून मोदींचे कौतुक

भारतात ज्या निवडणुका होतात, त्यात लोकांनी दिलेल्या बहुमतानुसार निवडणुकाचा निकाल लागतो. ज्याला जास्त मते मिळाली त्याला विजयी घोषित केले जाते. भारतात पक्ष पद्धतही अमेरिकेपेक्षा वेगळी आहे. अमेरिकेत फक्त दोन पक्षीय पद्धत आहे, ज्यात डेमोक्रॅटिक आणि रिपल्बिकन पक्षामध्ये लढत होते. दुसरीकडे भारतात बहुपक्षीय पद्धत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 37.6 टक्के मते मिळाली होती. लोकसभेत भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या.

21.41 कोटी नोंदणीकृत मतदार अमेरिकेच्या निवडणुकीत भाग घेणार आहेत.  इंस्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टेंसच्या माहितीनुसार मागील वर्षीच्या निवडणुकीत 91 कोटी भारतीय मतदारांनी भाग घेतला होता. दरम्यान, 3 नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. कोरोना महामारीच्या परिस्थितीत होत असलेल्या या निवडणुकीकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे. 

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: usa president election information in marathi