अमेरिकेचा पूर्व किनारा गारठला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

मेक्‍सिकोच्या आखातामध्ये दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळाने फ्लोरिडाला धडक दिल्यानंतर येथे काही ठिकाणी सावधगिरीचा इशारा जारी करण्यात आला होता. हे अतिथंड वारे ताशी 70 किमी वेगाने वाहत असल्याने येथील नागरिक चांगलेच गारठले होते

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर थंडीची मोठी लाट आली असून सातत्याने होणाऱ्या हिमवर्षावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत विक्रमी थंडी पडण्याची शक्‍यता येथील हवामान खात्याने वर्तविली आहे.

मेक्‍सिकोच्या आखातामध्ये दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळाने फ्लोरिडाला धडक दिल्यानंतर येथे काही ठिकाणी सावधगिरीचा इशारा जारी करण्यात आला होता. हे अतिथंड वारे ताशी 70 किमी वेगाने वाहत असल्याने येथील नागरिक चांगलेच गारठले होते. अनेक ठिकाणी 18 इंच जाडीचा बर्फाचा थर निर्माण झाला होता. यामुळे या भागातील शाळा, कार्यालये बंद ठेवावी लागली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: usa winter cyclone