समलैंगिक संबंधांबाबत पोप फ्रान्सिस यांचे आदेशाने खळबळ

pope francis
pope francis

व्हॅटिकन सिटी - पोप फ्रान्सिस हे गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून मॉडेल्सच्या फोटोंना लाइक केल्यानं चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा व्हॅटिकनने जारी केलेल्या नव्या आदेशामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. कॅथॅलिक चर्च समलैंगिक जोडप्यांना आशीर्वाद देऊ शकत नाही असं व्हॅटिकनने काढलेल्या नव्या पत्रकात म्हटलं आहे. देव वाईट गोष्टींना आशीर्वाद देत नाही असं अजब कारण यावर दिलं आहे. कॅथलिक चर्चमधील महिला प्रिस्ट समलैंगिक विवाह सोहळ्यात जाऊन दाम्पत्याला आशीर्वाद देऊ शकतात का असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर दोन पानांचा खुलासा व्हॅटिकनने केला आहे. चर्चकडून सात वेगवेगळ्या भाषांमध्ये हे उत्तर दिलं असून याला पोप फ्रान्सिस यांनीही संमती दिली आहे. 

चर्चने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, समलैंगिक व्यक्तींना योग्य वागणूक द्यायला पाहिजे. पण अशा लग्नांमध्ये आशीर्वाद द्यायला जाता येणार नाही. देवाच्या सांगण्यानुसार लग्न म्हणजे एक महिला आणि पुरुष स्वत:च्या मर्जीने एकत्र येण्याची पद्धत आहे. म्हणूनच देव समलैंगिक लग्नांसारख्या वाईट गोष्टींना आशीर्वाद देत नाही असं चर्चनं म्हटलं आहे. 

व्हॅटिककने प्रसिद्ध केलल्या पत्रकाबद्दल उलट सुलट प्रतिक्रिया येत आहे. जगातील अनेक देशांनी समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता दिली आहे. युरोपातील काही देशांमध्ये समलैंगिक लग्नांचं प्रमाणही वाढल आहे. तसंच इंटरनेटवर या विषयांवरही सहजपणे मतं व्यक्त केली जात आहेत. याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी एक आदेश जारी केला होता. त्यामध्ये अमेरिकन लष्करातील व्यक्तींना समलैंगिक संबंधाबाबत घालण्यात आलेले निर्बंध रद्द करण्याचा निर्णय़ घेतला. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात समलैंगिक व्यक्तींना अमेरिकेच्या लष्करात प्रवेश देण्यास निर्बंध घालण्यात आले होते.

समलैंगिक संबंधाला कायद्यानं गुन्हा ठरवणारं कलम भारतात रद्द करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2017 मध्ये याबाबतचा निर्णय देताना म्हटलं होतं की, खासगी आयुष्याबाबतचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे. तसंच लैंगिकता हा खासगी आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर 2018 च्या अखेरीस कलम 377 नुसार समलैंगिक संबंधांना मान्यता दिली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com