भारत-पाकमधील तणाव धोकादायक पातळीवर : डोनाल्ड ट्रम्प

भारत-पाकमधील तणाव धोकादायक पातळीवर : डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : पुलवामामधील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचला असला, तरीही या हल्ल्यात 40 जवान गमावलेल्या भारताची काही तरी कठोर कारवाई करण्याची इच्छाही आपल्याला समजू शकते, असे मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज व्यक्त केले. 

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची चहूबाजूंनी नाकेबंदी करण्यासाठी जोरदार राजनैतिक प्रयत्न सुरू केले असून, ट्रम्प यांचे हे विधान त्याचेच फलित असल्याचे मानले जात आहे. राष्ट्रीय धोरण म्हणून पाकिस्तान दहशतवादाचा वापर करीत असल्याचे भारताने अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर, द्विपक्षीय चर्चांदरम्यान ठामपणे सांगितले आहे.

अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय समितीनेही पाकिस्तानला दहशतवाद्यांना पाठबळ न देण्याबाबतचा इशारा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प यांनी आज याबाबतचे आपले मत मांडले. काश्‍मीरमधील परिस्थिती अत्यंत धोकादायक असल्याचे सांगत ट्रम्प यांनी भारताकडून कठोर कृतीची शक्‍यता व्यक्त केली. 

पाकिस्तानची मदत रोखली असली, तरी त्यांच्याशी चर्चा होऊ शकते, असे सांगतानाच ट्रम्प यांनी पाकिस्तानने त्यांना दिलेल्या सवलतींचा मोठा गैरफायदा उठवल्याचेही सांगितले. 

अनेक लोक हल्ल्यासंदर्भात बोलत आहेत. मात्र, परिस्थिती नाजूक झाली आहे. हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. येथील हिंसाचार थांबविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. 
- डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com