कोरोनामुळे प्रसिद्ध ज्येष्ठ कॉमेडियनचा मृत्यू 

कोरोनामुळे प्रसिद्ध ज्येष्ठ कॉमेडियनचा मृत्यू 

टोकियो : जपानमध्ये प्रसिद्ध ज्येष्ठ कॉमेडियन केन शिमुरा यांचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

जपान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, केन शिमुरा यांचा रविवारी कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. शुमारा यांना न्यूमोनियाची लक्षणे आढळल्याने 20 मार्चला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, 23 मार्चला त्यांची कोरोनाची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेले केन शिमुरा हे पहिले सेलिब्रिटी आहेत. 

शिमुरा हे मुळचे टोकियोजवळील हिगाशिमुरायामा शहरातील होते. यासुनोरी शिमुरा असे त्यांचे खरे नाव होते. 1974 मध्ये जपानमध्ये प्रसिद्ध झालेल्या 'ड्रिफ्टर्स' या कॉमिक सिरीजमध्ये त्यांची भूमिका प्रमुख होती. नंतर त्यांनी टेलिव्हिजनवर 'हॅचिजिडायो झेनिनशुगो' हा प्राईम टाईम शो सुरु केला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com