...आता व्हिडिओ गेम खेळणे आरोग्यासाठी चांगलंच

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 17 November 2020

व्हिडिओ गेम्स खेळणे म्हणजे वेळ वाया घालवणे असा समज आपल्याकडे आहे. याबद्दल समाजात बरीच संमिश्र मते येतात.

लंडन: व्हिडिओ गेम्स खेळणे म्हणजे वेळ वाया घालवणे असा समज आपल्याकडे आहे. याबद्दल समाजात बरीच संमिश्र मते येतात. पण ऑक्सफर्ड विद्यापीठाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या नव्या संशोधनात असं म्हटलं आहे की, व्हिडिओ गेम्स खेळण्यात घालवलेला वेळ तुमच्यात सकारात्मकता पसरवते.

सकारात्मकता वाढते-
कोरोना साथीच्या रोगाने अधिकाधिक लोक घरांमध्ये व्हिडिओ गेम्स खेळताना आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांशी कनेक्ट होताना दिसले आहेत. व्हिडिओ गेम्समधून खेळाडूंना मोठा आनंद अनुभवता येतो, त्यामुळे त्यांची सकारात्मकता वाढते, असा निष्कर्षही या सर्वेक्षणात समोर आला आहे.

'इतक्यात नाहीच... कोरोनातून सावरायला आणखी वेळ लागणार'

आरोग्यासाठीही चांगले-
संशोधकांनी लोकप्रिय व्हिडिओ गेम्ससाठी किती वेळ जातोय हे पहिल्यांदा संशोधनात पाहिलं. या अभ्यासात असा निष्कर्ष निघाला की खेळण्यात लागणारा प्रत्यक्ष वेळ हा लोकांच्या आरोग्यासाठी एक छोटासा पण महत्त्वाचा सकारात्मक घटक होता. तसेच खेळादरम्यान खेळाडूचे वस्तुनिष्ठ अनुभव केवळ खेळाच्या वेळेपेक्षा आनंदासाठी एक मोठा घटक असू शकतात.

प्रसिध्द गेमचा समावेश-
या अभ्यासात लोकप्रिय व्हिडिओ गेम्सच्या खेळाडूंचा अभ्यास केला आहे. यामध्ये Plants vs Zombies: Battle for Neighborville and Animal Crossing: New Horizons समावेश आहे. याची आकडेवारी पाहिली असता, खेळाच्या माध्यमातून इतरांशी सामाजिक संबंधाचे अनुभव बऱ्याच जणांच्या आरोग्याला हातभार लाभेल.

SpaceXच्या 4 अंतराळवीरांचं फ्लोरिडातील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून उड्डाण

तीन गोष्टींची मोजणी-
या संशोधनात 3,270 खेळाडूंना खेळादरम्यान मिळणारा आनंद, गेमचा स्वयं अहवाल आणि प्रेरणादायी अनुभवाची मोजणी या संशोधनात केली. सर्वेक्षणाचे निष्कर्ष व्हिडिओ गेम कंपन्यांनी गोळा केलेल्या सर्वेक्षणातील सहभागींसाठी वस्तुनिष्ठ वर्तणुकीच्या डेटाशी जोडले गेले.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: video games is good for health said oxford university study