Video : सलूनमध्ये हेअर ड्रायरचा स्फोट! आगीच्या भडक्यात ग्राहक, हेअर स्टायलिस्ट पेटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hair Saloon blast

Video : सलूनमध्ये हेअर ड्रायरचा स्फोट! आगीच्या भडक्यात ग्राहक, हेअर स्टायलिस्ट पेटले

नवी दिल्ली : सलूनमध्ये तुम्ही ग्रुमिंग करताना विविध उपकरणांचा वापर करत असालच. पण हे करत असताना सावधान! अत्यंत काळजीपूर्वक या उपकरणांचा वापर होतोय ना? याची खात्री करुन घ्या. कारण अचानक एका हेअर ड्रायरलचा स्फोट होऊन त्यात हेअर स्टायलिस्ट आणि ग्राहक असे दोघेही भाजल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Video Hair dryer explosion Customer hair stylists burned in the fire)

एका ट्विटर युजरनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सलूमध्ये केस कापण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाचे केस सुकवण्यासाठी दुकानदार अर्थात हेअर स्टायलिस्ट आपला हेअर ड्रायर प्लगइन करतो. त्यानंतर ड्रायर सुरु करताच शॉर्ट सर्किट होतं आणि त्यामुळं स्फोट होऊन आग लागते. हा स्फोट आणि आग एकाचवेळी भडकल्यानं केस कापणारा आणि ग्राहक असे दोघेही त्यात भाजले गेले.

दरम्यान, हा व्हिडिओ बांगलादेशातील नारायणगंज भागातील काचपूर इथला असल्याचं सांगितलं जात आहे. स्फोटामागील कारण असंही सांगितलं जात आहे की, सलूनमधील एसीमधील गॅस लीक झाल्यानं त्याचवेळी हेअर ड्रायर सुरु केल्यानं स्पार्क होऊन त्याचा स्फोट झाला.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेक युजर्सनं प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये अनेकांनी हा व्हिडिओ धक्कादायक आणि हृदयद्रावक असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी सलूनमध्ये काळजी घेणं गरजेचं असल्याचं म्हटलंय तर अनेक जण हेअर स्टायलिस्ट आणि कस्टमर यांना श्रद्धांजली वाहूनही मोकळे झाले आहेत.

Web Title: Video Hair Dryer Explosion Customer Hair Stylists Burned In The Fire

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :global newsviral video