रस्त्याच्या कडेला पांढऱ्या चादरीमध्ये झोपलेल्या व्यक्तीचे मृत शरीर समजून झाली गर्दी, तो उठताच...

सुस्मिता वडतिले 
Wednesday, 9 September 2020

या व्हिडिओमध्ये ती व्यक्ती रस्त्याच्या कडेला पांढरी चादर परिधान केलेली दिसत आहे. डेड बॉडी समजून लोकांनी गर्दी केली. हे प्रकरण वाढलेले पाहून पोलिसही तेथे पोहोचले. पोलिसाने चादर उचलताच तो माणूस उभा राहिला.

पुणे : रोजच क्षणा क्षणाला सोशल मीडियावर काही ना काही व्हायरल होत असते. त्यातीलच आणखीन एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तो म्हणजे एका ठिकाणी एक व्यक्ती रस्त्यावर झोपली आहे. पण तुम्हाला वाटेल त्यात काय नवीन पण यातील खास गोष्ट अशी आहे की, तो व्यक्ती पांढरी चादर घेऊन झोपलेला आहे. यामुळे लोकांनी असा अंदाज लावला की, रस्त्यावर मृतदेह पडला आहे. तेच पाहण्यासाठी लोक जमले होते. पण तो उठताच लोक घाबरुन पळून गेले. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी हा मजेदार व्हिडिओ शेयर केला आहे. 

 

या व्हिडिओमध्ये ती व्यक्ती रस्त्याच्या कडेला पांढरी चादर परिधान केलेली दिसत आहे. डेड बॉडी समजून लोकांनी गर्दी केली. हे प्रकरण वाढलेले पाहून पोलिसही तेथे पोहोचले. पोलिसाने चादर उचलताच तो माणूस उभा राहिला. त्याला उठलेल पाहून आजूबाजूला जमलेले लोक पळून गेले. तो व्यक्तीही उठला आणि आश्चर्याने जमलेल्या गर्दीकडे पाहू लागला.

हा व्हिडिओ पोस्ट करताना आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी कॅप्शनमध्ये हे लिहिले आहे की, आजकाल लोक कुणालाही शांतपणे झोपूसुद्धा देत नाहीत. त्यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्याचे आतापर्यंत 10 हजाराहून अधिक व्ह्यूज झाले आहेत. तसेच, एक हजाराहून अधिक लाईक्स आणि 294 री-ट्वीट झाले आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A video of a man sleeping in a white sheet is going viral on social media