...म्हणून 80 वर्षांत कधी केस कापले ना धुतले

वृत्तसंस्था
Wednesday, 26 August 2020

एका व्यक्तीने आयुष्यात कधी केस धुतलेही नाही आणि कापलेही नाहीत. त्या व्यक्तीचे वय 92 असून, केस 5 मीटर लांब आहेत. केस कापल्यामुळे मृत्यू होईल, या भितीपोटी केस कधी कापलेच नाहीत, असे त्या व्यक्तीने सांगितले. ग्युयेन वान चिएन असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

हानोई (व्हिएतनाम): एका व्यक्तीने आयुष्यात कधी केस धुतलेही नाही आणि कापलेही नाहीत. त्या व्यक्तीचे वय 92 असून, केस 5 मीटर लांब आहेत. केस कापल्यामुळे मृत्यू होईल, या भितीपोटी केस कधी कापलेच नाहीत, असे त्या व्यक्तीने सांगितले. ग्युयेन वान चिएन असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

Nguyen Van Chien, 92, sits for a portrait to show his 5-meter long hair which, according to him, has not been cut for nearly 70 years, at his home in Tien Giang province, Vietnam , August 21, 2020. Picture taken August 21, 2020. REUTERS/Yen Doung ORG XMIT: HFS-GGGVIE04

चिएन हे व्हिएतनाम मधील हो चि मिन्ह सिटी या गावामध्ये त्यांच्या 62 वर्षीय मुलासोबत राहतात. त्यांनी सांगितले की, 'मी तिसरी पर्यंत शाळा शिकलो आहे. एकदा शाळेत शिक्षकाने माझे केस कापायला लावले होते. पण त्यानंतर मी कधी केस कापलेच नाही. ना कधी ते धुतले किंवा विंचारले. केस कापल्यामुळे मृत्यू होईल, अशी मनात भिती होती. दैवी शक्तीने माझी निवड केली असल्याचे मला जाणवले. त्यानंतर गेल्या 80 वर्षात मी एकदाही केसांना पाणी लावलेले नाही. कंगव्याने विंचरलेले सुद्धा नाही. पण, केसांची चांगल्या प्रकारे निगा राखायचा प्रयत्न करतो. घराबाहेर पडतो तेव्हा केस स्कार्फने बांधतो. त्यामुळे ते सुरक्षित राहतात. पण, केस कधी धुतले नसल्यामुळे ते कडक झाले आहेत. माझ्या डोक्याचाच एक भाग बनला असून, मला त्याचे ओझे वाटत नाही.'

Nguyen Van Chien, 92, sits for a portrait to show his 5-meter long hair which according to him, has not been cut for nearly 70 years, at his home in Tien Giang province, Vietnam, August 21, 2020. Picture taken August 21, 2020. REUTERS/Yen Doung ORG XMIT: HFS-GGGVIE01

अंत्यसंस्कार करण्यापूर्वी युवतीने केली डोळ्यांची उघडझाप...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vietnamese man has 5 metre long hair didnt trim comb or wash them for 80 years

Tags
टॉपिकस
Topic Tags: