अक्रोड तोडण्यासाठी हातगोळ्याचा वापर

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

अनकांग (चीन) - काळ आला होता पण वेळ आली नव्हती असाच काहीसा अनुभव अनकांग येथे राहणाऱ्या नागरीकाला आला आहे. या नागरिकाजवळ 'हँड ग्रॅनाइड' (हातगोळा) सापडल्याने अचानक खळबळ उडाली. रॅन असे त्याचे नाव असून, आपण ही वस्तू गेले 25 वर्ष अक्रोड तोडण्यासाठी अवजार म्हणून वापरत असल्याचे त्याने सांगितल्यावर स्थानिक पोलिसांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

रॅन वापरत असलेली वस्तू हातगोळा असल्याची त्याला कोणतीही कल्पना नसल्याचा खूलासा पोलिसांनी देखील केला आहे. तसेच त्या हातगोळ्याला कोणतीही पीन नसल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. असे असले तरी, हातगोळ्याचा स्फोट होऊ शकतो का? याबाबतचा तपास सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1960च्या दशकातील हा हातगोळा असावा. 

रॅन यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 1991मध्ये त्यांना भेटवस्तू म्हणून हा हातगोळा मिळाला होता. परंतु, ही भेट कोणी दिली याबाबत रॅन यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

Web Title: A villager cracked nuts with a hand grenade for 25 years

टॅग्स