Viral News : किडे खाल्ले, मुत्रप्राशन केलं पण निबीड जंगलात जीवंत राहिला.. थक्क करणारी कहाणी | Survival Motivational Story | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral News

Viral News : किडे खाल्ले, मुत्रप्राशन केलं पण निबीड जंगलात जीवंत राहिला.. थक्क करणारी कहाणी

Survival Story : एका महिन्यापासून न खातापिता कोणी राहू शकतं का? खरं तर शक्य नाही पण बोलिवयाच्या एक व्यक्ती ॲमेझॉनच्या घनदाट आणि धोकादायक जंगलात ३१ दिवस भटकत होता. ३१ दिवसानंतर त्याला रेस्क्यू करण्यात आले.

व्यक्तीने जीवंत राहण्यासाठी काय खाल्लं, याचा तुम्हीही विचारही करू शकणार नाही. आज आम्ही तुम्हाला त्याचीच ह्रदय पिळवटून टाकणारी गोष्ट सांगणार आहोत. चला तर सविस्तर जाणून घेऊया. (Viral News a man survived for 31 days in amazon forest by eating insects and drink urine read story )

30 वर्षीय जोनाथन एकोस्टा आपल्या चार मित्रासह 25 जानेवरीला उत्तर बोलिवियाच्या ॲमेझॉन जंगलामध्ये शिकार करायला गेला होता. शिकारदरम्यान तो हरवला. त्याच्याजवळ पिस्तोल होती पण त्यात एकच गोळी होती. एकोस्टाजवळ आगपेटीही नव्हती आणि कोणताही टॉर्च नव्हता.

एकोस्टाने सांगितले की जीवंत राहण्यासाठी त्याने काय काय खाल्ले. त्याची ही कहाणी वाचून तुमच्याही अंगावर काटा येणार.

एकोस्टाने रडत रडत एका स्थानिक टिव्ही चॅनलला सांगितले, "हा थक्क करणारा अनुभव होता. मला विश्वास बसत नाही की इतक्या दिवसापर्यंत माझा शोध घेणे सुरू होते. मी जंगलात किडे खाल्ले. तुम्हाला विश्वास बसणार नाही की जीवंत राहण्यासाठी मी काय काय खाल्लं"

त्याने सांगितलं की जीवंत राहण्यासाठी त्याने जंगलात पपई सारखं एक फळ ही खाल्लं. तो प्रत्येकवेळी पावसासाठी प्रार्थना करायचा ज्यामुळे त्याला पिण्यासाठी पाणी मिळणार.

पावसाचं पाणी तो आपल्या बुटात जमा करुन प्यायचा पण जेव्हा काही दिवस पाऊस आला नाही तेव्हा जीवंत राहण्यासाठी त्याने मुत्रप्राशन सुद्धा केलं.

त्यानं सांगितलं की जंगलातील काही जगुआरसह धोकादायक प्राण्यांशी त्याचा सामना झाला. त्याने त्याच्या पिस्तोलमधील वाचलेल्या एका गोळीचा उपयोग प्राण्यांना भीती दाखवण्यासाठी केला.

एकोस्टा जंगलात तो 31 दिवसपर्यंत जीवंत राहण्यास यशस्वी झाला. त्यानंतर एका रेस्क्यू टिमने त्याला शोधून काढलं. जंगलात पाण्याच्या कमतरतेमुळे त्याचा चेहरा पुर्णपणे सुजला होता. रेस्क्यूनंतर त्याला हॉस्पिटल नेण्यात आले जिथे त्याच्यावर उपचार केले गेले

हा खूप मोठा चमत्कार होता. एकोस्टाने आता त्याचं आयुष्य देवाला समर्पित करण्याचं ठरवलं आहे. तो म्हणाला, "आता मी शिकार करण्यासाठी कधीही जाणार नाही आणि माझं आयुष्य देव आणि भक्तीत घालवणार."

टॅग्स :viraltrendForest