व्हिसाबंदी धर्माविरुद्ध नव्हे, तर सुरक्षेसाठी

पीटीआय
बुधवार, 14 जून 2017

वॉशिंग्टन - अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने घेतलेला व्हिसाबंदीचा निर्णय हा देशाच्या सुरक्षेशी संबंधित असून, तो कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, असे मत अमेरिकेचे ऍटर्नी जनरल जेफ सेशन यांनी मांडले. सहा मुस्लिम देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याबाबतच्या सुधारित आदेशाला स्थगिती देण्याचा खालच्या न्यायालयाचा निर्णय अमेरिकेतील अपिलीय न्यायालयाने कायम ठेवला असून, त्यानंतर सेशन यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

एकूण सहा मुस्लिम देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुधारित आदेश काढला होता. त्यास अमेरिकेतील न्यायालयाने स्थगिती दिली होती. अपिलीय न्यायालयाने ही स्थगिती कायम ठेवण्याचा आदेश सोमवारी दिला होता. अपिलीय न्यायालयाच्या या निर्णयाशी प्रशासन सहमत नाही, असे सेशन म्हणाले.

अध्यक्ष ट्रम्प यांना काँग्रेसने दिलेल्या अधिकारांच्या कक्षेत ही बाब येत नसल्याचे मत व्यक्त करत अपिलीय न्यायालयाने प्रशासनाला फटकारले होते. हा निर्णय म्हणजे ट्रम्प प्रशासनाला न्यायालयाने चपराक लागावल्याचे मानले जाते. इरान, लीबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि येमेन आदी देशांतील नागरिकांना 90 दिवसांसाठी अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचा आदेश ट्रम्प यांनी काढला आहे.

Web Title: visa ban donald trump america marathi news