ट्रम्प वगळता अमेरिकेतल्या प्रमुख नेत्यांना रशियात बंदी; पुतिन यांचा निर्णय

पुतिन यांच्या धोरणांना सातत्याने विरोध करणाऱ्या अनेकांना रशिया येण्यापासून बंदी घालण्यात आली आहे
Vladimir Putin
Vladimir Putinsakal

रशिया आणि युक्रेनदरम्यान संघर्षाला आता जवळपास तीन महिने झाले. या दरम्यान जगभरातून अनेक देशांनी रशियाची अनेक मार्गांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच रशियाने आता अमेरिकेतल्या अनेकांना रशियात बंदी घातली आहे. रशियाकडून जारी करण्यात आलेल्या स्टॉप लिस्टमध्ये जो बायडेन, कमला हॅरिस यांच्यासह अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे. (Vladimir Putin banned americans from entering russia)

मॉस्को या रशियाच्या राजधानीकडून दिलेल्या माहितीनुसार, या यादीत अशा लोकांचा समावेश आहे, जे रशियाचा द्वेष करतात आणि जे अशा लोकांना पाठिंबा देतात. ज्यांनी आमचा आदर केला, अशा सामान्य अमेरिकी लोकांचा समावेश या यादीत नाही. या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस, अँटनी ब्लिंकन यांच्यासह हॉलिवूड कलाकार मॉर्गन फ्रीमन आणि रॉब रेनर यांच्यासह अनेकांना रशियात प्रवेश बंदी आहे.

वॉशिग्टनच्या ज्या काही छुप्या कारवाया सुरू आहेत, त्या त्यांच्यावरच उलटतील, त्यांना इथून पुढे सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाईल, असंही रशियाने म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन युक्रेनयुद्ध सुरू झाल्यापासून सातत्याने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांच्याविरोधात भाष्य करत आहेत. त्यामुळेच त्यांचं नाव या रशियात येण्यास बंदी असलेल्यांच्या यादीत टाकण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तर या यादीबद्दलची माहिती समोर आल्यानंतर यात डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचं नाव नसल्याचं अनेकांनी दाखवून दिलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com