Vladimir Putin : युक्रेनच्या बळकावलेल्या प्रांतात पुतीन यांचा दौरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vladimir Putin

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी युक्रेनच्या महत्त्वाच्या भागावर ताबा मिळविलेल्या सैन्याच्या मुख्यालयाला भेट दिली.

Vladimir Putin : युक्रेनच्या बळकावलेल्या प्रांतात पुतीन यांचा दौरा

किव्ह - रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी युक्रेनच्या महत्त्वाच्या भागावर ताबा मिळविलेल्या सैन्याच्या मुख्यालयाला भेट दिली. मार्च महिन्यापासून त्यांची रशियाच्या ताब्यातील युक्रेनच्या भागाला दिलेली ही दुसरी भेट आहे.

रशियाच्या अध्यक्षांच्या कार्यालयाने याची चित्रफीत जारी केली आहे. त्यानुसार पुतीन यांनी दक्षिण खेरसन आणि लुहान्स्क या प्रांतांचा दौरा केला. या चित्रफितींची सत्यता स्वतंत्रपणे पडताळणे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांना शक्य झाले नाही.

पुतीन हेलिकॉप्टरने दाखल झाले. त्यानंतर त्यांनी युद्धाच्या स्थितीबाबत प्रमुख लष्करी अधिकाऱ्यांकडून अहवालांद्वारे माहिती घेतली. त्यानंतर पुतीन हेलिकॉप्टरनेच रशियन नॅशनल गार्ड्सच्या पूर्व लुहान्स्क प्रांतातील मुख्यालयात दाखल झाले. तेथे त्यांनी कमांडर पदावरील अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

दोन्ही ठिकाणी पुतीन यांनी ईस्टर सणानिमित्त सैनिकांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्याहस्ते सैनिकांना स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली.

युक्रेनवर गेल्या वर्षी आक्रमण केल्यानंतर रशियाने सप्टेंबर महिन्यात दोनेत्स्क, झॅपोरिझ्झिया, खेरसन आणि लुहान्स्क या प्रांतांवर ताबा मिळविला आहे.

याआधी पुतीन यांनी गेल्या महिन्यात मारीऊपोलमधील अझोव या बंदराच्या शहराला भेट दिली होती.