जगाच्या लाडक्या कारची निर्मिती कायमची बंद

वृत्तसंस्था
रविवार, 14 जुलै 2019

लहान कीटकासारखा आकार, मोठे डोळे म्हणजेच हेडलाइट्स आणि तिचं ते छोटुसं रूप जे कुठल्याही रंगात छान दिसतं. म्हणूनच जगभरात सर्वाधिक विकल्या गेलेल्या गाड्यांपैकी एक म्हणजे फोक्सवॅगनची बीटल गाडी. या सर्वांच्या लाडक्या कारची निर्मीती कायमची बंद झाली आहे.

पुणे : लहान कीटकासारखा आकार, मोठे डोळे म्हणजेच हेडलाइट्स आणि तिचं ते छोटुसं रूप जे कुठल्याही रंगात छान दिसतं. म्हणूनच जगभरात सर्वाधिक विकल्या गेलेल्या गाड्यांपैकी एक म्हणजे फोक्सवॅगनची बीटल गाडी. या सर्वांच्या लाडक्या कारची निर्मीती कायमची बंद झाली आहे.

10 जुलैला फोक्सवॅगनने अखेरची बीटल गाडी आपल्या कारखान्यातून रवाना केली. यानंतर या आयकॉनिक गाडीची निर्मिती होणार नाही, हे कंपनीने आधीच स्पष्ट केलं होतं. ही गाडी एकेकाळी जगात सर्वांत विकली जाणारी गाडी होती. आणि तिच्या क्यूट रूपामुळे अनेकांनी या गाडीला ती बंद पडल्यावरही कुठल्या ना कुठल्या रूपात जपून ठेवली आहे.

ऑटोमोबाईल क्षेत्राचा इतिहास पाहिला तर फोक्सवॅगन बीटलला नेहमीच चाहत्यांचं प्रेम लाभल्याचं लक्षात येतं. जर्मनीत तयार झालेली बीटल मेक्सिकोच्या संस्कृतीचा भाग कधी झाली, हे तिथल्या लोकांना कळलंही नाही. ही गाडी साधारण 50 वर्षांपूर्वी मेक्सिकोच्या बाजारात दाखल झाली. मेक्सिकोतल्या ग्राहकांच्या उदंड प्रतिसादानं या गाडीची मागणी दिवसेंदिवस वाढतच गेली.

2003 मध्ये कंपनीने मूळ मॉडेलचं उत्पादन बंद केलं. पण मेक्सिकोत आजही मूळ गाडी हमखास नजरेस पडते. छोटे रस्ते, पार्किंग लॉट्स, ट्रॅफिक सिग्नल अशी सगळीकडे फोक्सवॅगन बीटल गाडी आजही फिरताना दिसते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Volkswagen Beetle production ends; final unit rolls off the production line