'ग्रीन कार्ड' हवयं, तर थांबा 151 वर्षे !

वृत्तसंस्था
शनिवार, 16 जून 2018

सध्या व्हिसाच्या गणनेनुसार, या सर्वांना अमेरिकेतील ग्रीन कार्ड मिळविण्यासाठी 151 वर्षे वाट पाहण्याची शक्यता आहे. जोपर्यंत याबाबतचा कायदा बदलत नाही, तोपर्यंत ते मृत पावलेले असतील किंवा ते सध्या राहत असलेले ठिकाण सोडून गेलेले असतील, असे कॅटो इन्स्टिट्यूटने सांगितले. 

वॉशिंग्टन : अमेरिकेत राहण्यासाठी किंवा नोकरी करण्यासाठी भारतीयांना 'ग्रीन कार्ड' देण्यात येते. मात्र, हे ग्रीन कार्ड मिळविण्यासाठी भारतीयांना आता 151 वर्षे थांबावे लागण्याची शक्यता आहे. याबाबत एका थिंक टँकने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. तसेच ग्रीन कार्ड वाटप प्रक्रियेतही बदल केला जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

वॉशिंग्टनस्थित थिंक टँक काटो इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ग्रीन कार्ड वाटप करण्याच्या आधारावर गणना करण्यात आली. त्यानुसार 20 एप्रिल, 2018 पर्यंत 6,32,219 भारतीय निर्वासित आणि त्यांचे पती/पत्नी आणि त्यांचे अल्पवयीन मुले सध्या ग्रीन कार्डच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे ग्रीन कार्डला सध्या 'लिगल परमनंट रेसिडेन्सी कार्ड' म्हणूनही ओळखले जाते. 'यूएससीआयएस'च्या मते आत्तापर्यंत 34,824 भारतीयांचे अर्ज ईबी-1 कॅटेगरीनुसार प्राप्त झाले आहेत. यामध्ये 48,754 पत्नी किंवा पती आणि मुलांचा समावेश आहे. 

Wait for green card for Indians may now be as long as 151 years

सध्या व्हिसाच्या गणनेनुसार, या सर्वांना अमेरिकेतील ग्रीन कार्ड मिळविण्यासाठी 151 वर्षे वाट पाहण्याची शक्यता आहे. जोपर्यंत याबाबतचा कायदा बदलत नाही, तोपर्यंत ते मृत पावलेले असतील किंवा ते सध्या राहत असलेले ठिकाण सोडून गेलेले असतील, असे कॅटो इन्स्टिट्यूटने सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wait for green card for Indians may now be as long as 151 years