वाचा कोण आहे ही 'स्पायडरवूमन'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

सुसांतीने ही कामगिरी शनिवारी पार पडलेल्या 'झियामेन वर्ल्ड कप'मध्ये केली आहे.

इंडोनेशियाची वेगवान गिर्यारोहक अशी ओळख असणा-या सुसांती रहायू हिने 15 मीटर उंचीची भिंत अवघ्या सात सेंकदात चढत एका नवीन जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. सुसांतीने ही कामगिरी शनिवारी पार पडलेल्या 'झियामेन वर्ल्ड कप'मध्ये केली आहे. विशेष म्हणजे ही कामगिरी करत असताना तिच्या हाताना दुखापत झाली असताना देखील तिने उत्कृष्टरित्या चढाई करत हा विक्रम आपल्या नावे केला आहे. 
 
याआधी हा रेकॅार्ड चीनच्या यिंलिंग साँग याच्या नावे असून अवघ्या 0.11 सेकंदाच्या फरकाने सुसांतीने हा विक्रम मोडला आहे. साँगने हा रेकॅार्ड एप्रिलमध्ये पार पडलेल्या आयएफसी वर्ल्ड कपमध्ये केला होता. इंडोनेशियाची 'स्पायडरवूमन' असे नाव असणा-या सुसांतीला खरी ओळख ही 2018 मध्ये मिळाली. तिच्या गिर्यारोहनाच्या अप्रतिम कामगिरीमुळे फोर्बसच्या आशियातील '30 अंडर 30' या खेळाडूंच्या यादीत ती एकमेव इंडोनेशियन होती. त्यानंतर तिने टोकीयोमधील एका स्पर्धेत सुवर्णपदक देखील जिंकले होते.

काय आहे स्पीड क्लाइंबिंग

स्पीड क्लाइंबिंग या खेळात वेगामध्ये भिंतीवर चढावे लागते. यावेळी भिंतीवर काही दगड लावलेले असतात ज्यांच्या सहाय्याने भिंतीवर चढावे लागते. या खेळात वेग सर्वात महत्त्वाचा असतो. सध्यस्थितीला स्पीड क्लाइंबिंग हा खेळ  जास्त लोकांना माहित नसला तरी पुढील वर्षी टोकियो मध्ये पार पडणा-या 'टोकियो समर आँलपिक्स' मध्ये हा खेळ पहिल्यांदा आँलपिकमध्ये खेळण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The wall height of 15 meters climbed in only 7 sec