दक्षिण कोरियामध्ये कोरोनामुळे अतिदक्षतेचा इशारा 

पीटीआय
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

कोरियामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत असून करोनामुळे चार जणांचा मृत्यू झाला असून ५५६ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.

कोडोग्नो - चीन पाठोपाठ आता दक्षिण कोरियामध्ये कोरानाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे. कोरियामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत असून करोनामुळे चार जणांचा मृत्यू झाला असून ५५६ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. राजधानी सेऊलमध्ये आत्तापर्यंत ९ हजारहून अधिकजणांची स्क्रिनिंग करण्यात आली असल्याचेही अधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

करोनाच्या संसर्गामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली असून न्यूमोनिआ आणि करोना सदृष्य आजारांनी बाधित असणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी चिओंगडो रुग्णालयातून इतरत्र हालवण्यात येत आहे. यातील १७ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केले. 

इटली आणि इराणमध्ये प्रसार 
इटली मध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या संशयित रुग्णांचा आकडा शंभरावर पोहोचला असल्याची माहिती उत्तर लोम्बार्डी प्रांताच्या अध्यक्षांनी रविवारी दिली असून इटलीमध्ये याचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. तर, दुसरीकडे इराणमध्ये रविवारी गेल्या तीन जणांचा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झाल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले असून इराणमध्ये आत्तापर्यंत आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ४३ जणांना याचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warning against Corona in South Korea