नाणेनिधीच्या मदतीनंतर पुढच्याच आठवड्यात उठाव

नाणेनिधीच्या मदतीनंतर पुढच्याच आठवड्यात उठाव

वॉशिंग्टन - म्यानमारमध्ये लष्करी उठाव होण्यापूर्वीच्याच आठवड्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) या देशाला ३५ कोटी डॉलरचा निधी पाठविला होता. आता त्याचा परतावा या संस्थेसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
कोरोनाच्या जागतिक साथीतून सावरण्यासाठी आर्थिक उपक्रमाच्या अंतर्गत ही रक्कम आणीबाणीचा उपाय म्हणून त्वरेने विनाशर्त वितरित केली जात आहे. आयएमएफच्या संचालक मंडळाने १३ जानेवारी रोजी यास मंजुरी दिली होती असे रक्कम देण्याचे व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय अर्थपुरवठ्याची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले. त्यानंतरच्याच आठवड्यात लष्कराने बहुमताने निवडून आलेल्या नेत्या आँग सान स्यू की आणि इतर अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयएमएफच्या प्रवक्त्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्ही म्यानमारमधील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. त्या देशाची अर्थव्यवस्था आणि जनतेवर होणाऱ्या परिणामांची आम्हाला तीव्र चिंता वाटते.

फटका बसलेल्यांना मदत
ही मदत देण्यामागे सरकारला दीर्घकालीन आर्थिक आणि वित्त स्थिरता आणता यावी आणि कोरोनाचा फटका बसलेल्या क्षेत्रांना तसेच कमकुवत गटांना मदत देता यावी हे उद्देश होते. गेल्या वर्षापासून आयएमएफने म्यानमारला १५ कोटी डॉलरची मदत केली आहे.

एकरकमी मदत
आयएमएपच्या नियमित आर्थिक उपक्रमांतर्गत धोरणविषयक सुधारणांसाठीच्या कराराचा निकष असतो आणि त्यासाठी छोट्या हप्त्यांत मदत दिली जाते. कोरोनासारखी आणाबाणीकालीन मदत मात्र एकरकमी दिली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com