नोटाबंदीचे आणखी फायदे भविष्यात दिसून येतील

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मत; डिजिटल पेमेंट कार्यक्षम

वॉशिंग्टन : नोटाबंदीमुळे रोकडटंचाई निर्माण झाल्याने भारतातील आर्थिक क्षेत्रात तात्पुरत्या स्वरुपात अडथळे आले; परंतु आता हे अडथळे कमी होऊ लागले आहेत, भविष्यात नोटाबंदीचे आणखी फायदे दिसून येतील, असे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) व्यक्त केले आहे.

"आयएमएफ'चे उपप्रवक्ते विलियम मरे म्हणाले, की सुमारे वर्षभरापूर्वी झालेल्या नोटाबंदीचे काही फायदे सध्या दिसत आहेत. भविष्यात नोटाबंदीचे आणखी मोठे फायदे दिसून येतील. नोटाबंदीमुळे आर्थिक घडामोडींमध्ये काही प्रमाणात अडथळे आले. रोकडटंचाईमुळे प्रामुख्याने व्यक्तिगत खर्च करण्यावर प्रतिबंध आला आणि छोट्या व्यावसायिकांना फटका बसला. परंतु, आता हे परिणाम कमी होऊ लागले आहेत.

मध्यम कालावधीचा विचार करता नोटांबदीचे परिणाम पाहता आर्थिक क्षेत्रात संघटित शिस्त आली आहे. याचबरोबर बॅंकिंग यंत्रणा आणि डिजिटल पेमेंट यांचा वापर वाढला असून, या दोन्ही गोष्टी कार्यक्षम बनल्या आहेत, असे मरे यांनी नमूद केले. भारत सरकारने गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला पाचशे व एक हजारच्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या. काळा पैसा आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते. "आयएमएफ' भारताच्या आर्थिक विकास दराबाबतचा सुधारित अंदाज जानेवारीमध्ये जाहीर करणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: washington news Further benefits of the nota bandi will be visible in the future